मुंबई : तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 376 महाविद्यालयातील पॉलिटेक्निकच्या (तंत्रनिकेतन) जागांवर नुकतीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठीची नोंदणी उशिरा करण्यात आली असेल तर संबधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणार आहेत. यामुळे संबंधित महाविद्यालयांनी आपल्याकडे झालेल्या सर्व प्रवेशाची इत्यंभूत माहिती आणि त्याचा अहवाल तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तातडीने सादर करावा अशी सूचना तंत्रशिक्षण संचालनालय आणि राज्यातील महाविद्यालयांना दिली आहे.
राज्यात असलेल्या 376 महाविद्यालयांत जागावार 62 हजार 122 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. मागील दोन वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांनी दिली. पूर्ण राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संकटामुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घट झालेली झाली आहे. अशात पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) साथीच्या प्रवेशात यंदा 10 टक्के वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पदवीच्या अभियांत्रिकीच्या जागा
मोठ्या प्रमाणावर रिक्त राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या जागा या यावेळी अधिक प्रमाणात भरल्या असल्या तरी झालेल्या सर्व प्रवेशांची पुन्हा महाविद्यालयस्तरावर पडताळणी केली जाणार आहे.
कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश करणे अशी तरतूद नाही. तरीही असे केलेले प्रवेश आणि उशिरा अपलोड केलेले प्रवेश मान्य होणार नाहीत. त्यामुळे राज्यभरातील सर्व पॉलिटेक्निक प्रवेशाची पडताळणी महाविद्यालय स्तरावर करावी, असे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.
2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ज्या शासकीय, अशासकीय, अनुदानित, विद्यापीठ विभाग, विद्यापीठ नियंत्रित तसेच खाजगी विनाअनुदानित संस्थातील पदविका अभ्यासक्रमात प्रवेश झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश यादीची तपासणी करुन विद्यार्थ्यांच्या अंतिम यादी मान्यतेकरिता व पडताळणी अहवालासह 31 मार्चपर्यंत सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असल्याची माहिती संचालक वाघ यांनी दिली.
महत्त्वाची बातमी : गळती आणि चोरी रोखण्याचे आव्हान ! गेल्या पाच वर्षात महावितरणची थकबाकी किती वाढली? वाचा
तर हे होणार प्रवेश रद्द..
राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये झालेले प्रवेश हे गुणवत्ता यादीनुसार झालेले आहेत का, हे तपासले जाणार आहे. तसेच हे प्रवेश नियमावलीनुसार करण्यात आलेले आहेत का ? याचीही माहिती घेतली जाणार आहे. उशिरा घेण्यात आलेल्या प्रवेशाची, तसेच मर्यादेपेक्षा अधिक घेण्यात आलेल्या प्रवेशाची माहिती दडवल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील. यासाठी संबंधित महाविद्यालये आणि संस्थांना जबाबदार धरले जाणार जाईल, असेही तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
mumbai news polytechnic admissions under scrutiny late admissions and illegal admissions will be cancelled
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.