Mumbai News: पवईच्या भीमनगरमध्ये जोरदार राडा! पोलिसांच्या पथकावर दगडफेक, 5 ते 6 जखमी झाल्याची माहिती

Encroachment By Mumbai Police:पवईच्या भीमनगरमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पालिकेचे कर्मचारी पोलिसांच्या पथवार जमावाने दगडफेक केल्याची माहिती आहे
Powai
Powai

मुंबई- पवईच्या भीमनगरमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्याची माहिती आहे. यात पाच ते सहा पोलीस जखमी झाल्याचं कळत आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस भीमनगर परिसरात गेले होते.

पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर काही लोकांनी पथकावर दगडफेक सुरु केली. २००७ मध्ये याठिकाणी कामगारांना तात्पुरते हलवण्यात आले. त्यानंतर याठिकाणी वसाहत उभी राहिली. वारंवार प्रशासनाने ही वसाहत हटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच दृष्टीने आजही महापालिकेचे अधिकारी मोठ्या प्रमाणात पोलीस घेऊन याठिकाणी गेले होते.

Powai
Mumbai Loksabha Result: कीर्तीकरांचा घोषित झालेला विजय वायकरांच्या बाजूनं कसा लागला? वायव्य मुंबईत नेमकं काय घडलं?

येथील नागरिकांच्या रोषाला पोलिसांना सामोरे जावे लागले आहे. ज्या ठिकाणी वसाहत आहे त्याठिकाणी ह्युमन राईंट्स कमिशनने नोटीस जारी केली होती. शासकीय वसाहत निर्माण करण्यासाठी ही जागा राखीव आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या असलेली घरे काढण्यासाठी पोलीस गेले होते. नागरिकांनी मात्र त्यांना जोरदार विरोध केला. यापूर्वी इतका तीव्र विरोध झाला नव्हता.

Powai
Mumbai News: मुंबईतून हरवलेली चार भावंड ग्वाल्हेरला सापडली, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

पोलीस आणखी फौजफाटा आणणार असल्याची माहिती मिळत आहे. कोर्टाच्या आदेशाने आपण ही वसाहत काढण्यासाठी आलो आहोत, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, नागरिकांचा याला विरोध आहे. नागरिक आणि पोलीस भिडल्याचं पाहायला मिळत आहे. दंगल नियंत्रण पथकाला प्राचारण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती स्फोटक बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com