"मोगलाई आणि सत्तेचा माज असल्यानेच आझाद मैदानात आंदोलकांवर लाठीमार"; प्रवीण दरेकरांचा आरोप

"मोगलाई आणि सत्तेचा माज असल्यानेच आझाद मैदानात आंदोलकांवर लाठीमार"; प्रवीण दरेकरांचा आरोप
Updated on

मुंबई, ता. 3 : सत्तेचा माज आणि मस्ती असल्यानेच यापूर्वी झाले नव्हते एवढे अत्याचार करून आझाद मैदानावरील आंदोलकांना बाहेर हाकलण्यात आले, अशी जळजळीत टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी कोरोनाच्या फैलावाचे कारण देऊन काल रात्री मैदानाबाहेर हुसकावून लावले. त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या लाठीमारात काहीजण जखमीही झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यासंदर्भात दरेकर यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे.  

राज्य सरकारच्या संवेदना पूर्णपणे हरपल्या आहेत, हेच यावरून दिसून येत आहे. आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लाठ्यांनी फोडून काढण्याचे काम सुरू आहे. काल हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या संगणक परिचालकांना मारहाण करण्यात आली. एवढी मोगलाई महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हती, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.

आताही आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना धमकवण्यात आले, इकडून निघा नाहीत लाठीमार करण्यात येईल, अशा धमक्या देण्यात आल्या. या राज्यात हिटलरशाही आहे का, असाही प्रश्न दरेकर यांनी विचारला आहे. आंदोलकांना न्याय द्यायचे तर दूरच राहिले, उलट त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सौजन्याने वागणुक देण्याची भूमिका लोकशाही मध्ये हवी होती. मात्र सत्तेचा माज आणि मस्ती या सरकारला एवढी आहे की आंदोलकांवर एवढे अत्याचार यापूर्वी कधीच झाले नाहीत, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.

mumbai news pravin darekar on lathicharge on the agitators at aazad maidan mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.