सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले महत्वाचे इनपुट, रश्मी शुक्ला यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता !

सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले महत्वाचे इनपुट, रश्मी शुक्ला यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता !
Updated on

मुंबई, ता. 25 : राज्याच्या राजकारणात भूकंप करणारा फोन टॅपिंग प्रकरणी राज्य सरकार अत्यंत आक्रमक झाले आहे. फोन टॅपिंग हा प्रकार राजकिय विकृती असून तो अवैध असल्याने कठोर कारवाईची तयारी सरकारने सुरू केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज तयार करण्यासाठी गृहविभागाची बैठक बोलवली होती. या बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. 

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केलं तेव्हा सीताराम कुंटे गृहविभागाचे अतीरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून याप्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचे कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळ बैठकीतच सांगितले होते. 

तसेच काही प्रमाणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली गेली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचेही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होते. यावरून रश्मी शुक्ला यांच्या प्रशासकिय भूमिकेबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. 

याप्रकरणात कुंटे यांनी सविस्तर अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या अहवालाबाबत सविस्तर चर्चा केली.

या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. गोपनिय अहवाल लिक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल होऊ शकतो.

mumbai news sitaram kunte phone tapping case rashmi shukla maharashtra politics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.