मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी SIT, गृहमंत्र्यांची घोषणा

मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी SIT, गृहमंत्र्यांची घोषणा
Updated on

मुंबई : दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल  देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केली. "मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. डेलकर यांना सार्वजनिक जीवनातून संपवण्याची धमकी देण्यात आली होती" असे अनिल देशमुख मंगळवारी विधानसभेत म्हणाले. 

मोहन डेलकर दादरा-नगर हवेलीमधील लोकप्रिय नेते होते. त्यांनी सात वेळालोकसभेची निवडणूक जिंकली होती. २२ फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील हॉटेलमध्ये ते मृतावस्थेत आढळले. शवविच्छेदन अहवालातून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं. २३ फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाने मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. 

दोन मार्चला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मोहन डेलकर यांनी चिठ्ठीमध्ये ज्यांची नावं लिहिली आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्र पोलीस मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करतील, असे जाहीर केले. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्यानंतरही विरोधी पक्ष शांत कसा? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

mumbai news special investigation team for mohan delkar death investigation says home minister anil deshmukh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.