Mumbai News : तांत्रिक बिघाड लोकल सेवा खोळब! मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेचे बिघाड सत्र सुरूच!

Mumbai Local Update
Mumbai Local Update esakal
Updated on

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी (ता.०६) सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेचा वसई स्थानकांत सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता तर, मध्य रेल्वर पावसामुळे लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

Mumbai Local Update
Mumbai Crime : युनियन बँकेची कोट्यवधीची फसवणूक; के.जे. इन्फ्रा कंपनी विरोधात CBI कडून गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, वसई रेल्वे स्थानकात सकाळी ९ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रीकी पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे अप दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागेएक खोळबल्या होत्या.

परिणामी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. या घटनेचा परिणाम पश्चिम रेल्वे उपनगरील लोकल सेवांवर दिवसभर दिसून आला. लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागला आहे.

पश्चिम रेल्वेवर सततच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हैराण झाले आहे. दर रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेऊन बिघाड घटना घडतच असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या कारभावर नागरजी व्यक्त केली आहे.

Mumbai Local Update
Uddhav Thackeray: बीएमसीची चौकशी करणार तर पीएम केअर फंडाचीही करा! उद्धव ठाकरेंची मागणी

मध्य रेल्वे विलंबाने

मध्य रेल्वे मार्गावरील १० ते १५ मिनिटे उशिराने लोकल सेवा धावत असल्याने कार्यलयात जणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर अडकून तात्कळत लोकलची वाट पाहत रहावे लागत आहे. पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलेटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांचा वेगावर बंधने येतात. परिणामी लोकलचे वेळापत्रक कोलमडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.