Mumbai News : गडबड मातोश्रीवरून होती, एकनाथ शिंदे शब्दाला जागणार-रविंद्र चव्हाण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचा महापौर मंत्री चव्हाण यांचे विधान
Mumbai News : गडबड मातोश्रीवरून होती, एकनाथ शिंदे शब्दाला जागणार-रविंद्र चव्हाण
Updated on

डोंबिवली - गडबड मातोश्री वरून होत होती, नाही तर एकनाथ शिंदे यांना देखील वाटत होतं की केडीएमसीमध्ये भाजपचा महापौर असावा. आता आपल्याला संधी आहे केडीएमसी मध्ये भाजपचा महापौर असेल एकनाथ शिंदे शब्दाला पाळणारे असून ते शब्दाला जगातील असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकीनंतर केडीएमसी मध्ये भाजपचा महापौर असेल असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या शब्दाची आठवण करून दिली आहे. निवडणूकीच्या आधीच कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर कोणाचं बसेल यावरून राजकीय पक्षांत चढाओढ निर्माण झाल्याची पहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा यांच्या वतीने पदाधिकारी, कार्यकारिणी नियुक्ती समारंभ कल्याण पूर्वेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, शशिकांत कांबळे, नरेंद्र पवार, नरेंद्र सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री चव्हाण यांनी आता कोणाला घाबरू नका बोलायला सुरुवात करा, पक्ष संघटन तुमच्या नेहमी पाठीशी उभे असेल असे म्हणत मार्गदर्शन केले. कल्याण पूर्व मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड व शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यात सुरू असलेला वाद सर्वश्रुत असताना फळ लागलेल्या झाडावरच लोक दगड मारतात त्यामुळे काम करत रहा असा सल्ला दिला. सल्ला देत पाठ थोपटतानाच गायकवाड यांचे चव्हाण यांनी कान पिळले.

d भाजप शिंदे यांच्या सांगण्यावरून चालत, ते महापौर काय बसवणार असे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केले होते. याला आमदार गायकवाड यांनी दुजोरा देत शिंदे पिता पुत्र आणि गटाकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर गायकवाड यांचे कान पिळताना ते म्हणाले, महापौर भाजपचाच होणार

ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेना भाजपा पक्ष एकत्र काम करत होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये सुधीर मुनगुटीवार यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक पार पडली होती. त्यावेळी कोणी किती काळ महापौर व उपमहापौर रहावे हे ठरले होते. आणि 2019 ला शेवटच्या टप्प्यात थोडी का होईना गडबड झाली. आणि ज्या वेळेला आम्हाला संधी होती त्या वेळेला कोणीतरी पक्ष नेतृत्व म्हणून सांगायला लागलं की आता त्यांना द्यायचं नाही

Mumbai News : गडबड मातोश्रीवरून होती, एकनाथ शिंदे शब्दाला जागणार-रविंद्र चव्हाण
WhatsApp : आता ios वापरकर्त्यांनाही मिळणार व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर

परंतु एकनाथ शिंदे हे शब्दाला पाळणारे आहेत. त्यांनी मला सांगितले होते की रवी अडचण फक्त मातोश्री वरून होत आहे. मला अस वाटत की महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे. आता आपल्याला संधी आहे की एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला जागणार आणि भाजपचा महापौर होणार. आता भाजप मधून महापौर कोणाला करायचं याविषयी स्पर्धा असेल असे त्यांनी सूतोवाच केले.

तर आमदार गायकवाड यांनी आपल्या भाषणात नाव न घेता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कल्याण पूर्वेतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष केले. कल्याण डोंबिवली मध्ये 129 कोटींची कामे आज दुसऱ्यांची नावे लावून

Mumbai News : गडबड मातोश्रीवरून होती, एकनाथ शिंदे शब्दाला जागणार-रविंद्र चव्हाण
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

केली जात आहेत. या कामांचा पाठपुरावा व त्यासाठी किती प्रयत्न केले हे मी सांगेल. माझ्या फाईल्स कोणाच्या टेबलाखाली दाबून ठेवल्या गेल्या हे वेळ आल्यावर मी सांगेल. मी सतत पक्ष बदलतो अशी टिका केली जाते पण यांना मी सांगेल की आता धनुष्यबाण सोबत रॉकेट देखील चालत व ते रॉकेट माझ्याकडे आहे असा इशारा त्यांनी शिंदे गटाला त्यांनी दिला आहे.

यामुळे आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मधील राजकारण कोणते वळण घेते हे पहावे लागेल.

याविषयी शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे व कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांना विचारले असता यावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Mumbai News : गडबड मातोश्रीवरून होती, एकनाथ शिंदे शब्दाला जागणार-रविंद्र चव्हाण
Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प! पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.