Mumbai Coastal Road: मुंबईच्या वाहतुकीला येणार वेग ! वर्सोवा - दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती

पालिकेचा नवा उद्द्योग: मुंबईच्या वाहतुकीला वेग देणारा वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड; सल्लागारासाठी पालिकेने काढल्या निविदा
Mumbai Coastal Road:
Mumbai Coastal Road:ESAKAL
Updated on

Mumbai News: मरीन लाईन्स ते वरळी दरम्यान कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आले असून दुस-या टप्प्यातील वर्सोवा - दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पालिका हाती घेणार आहे.

या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतर आता वर्सोवा ते बांगूर नगर व बांगूर नगर ते माईंड स्पेस मालाड आणि जीएमएलआर कनेक्टर आदी तीन भागातील कामाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला आता वेग येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटी रुपयांवर जाईल अशी माहिती पालिकेने दिली आहे.आणणार असून गोरेगाव मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

Mumbai Coastal Road:
Mumbai Weather News : तापमानाचा पारा वाढतच राज्यात वीज तापली; दैनंदिन मागणी 28 हजार मेगावॅटवर

मुंबई महापालिकेने उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यावर भर दिला आहे. मरीन लाइन्स ते वरळी दरम्यान कोस्टल रोड प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने हाती घेतले. सद्यस्थितीत हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मरीन लाइन्स ते थेट दहिसर भाईंदर पर्यंत जाता यावे यासाठी कोस्टल रोड प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Mumbai Coastal Road:
Mumbai News : खुशखबर! ५८५ गिरणी कामगारांना मिळणार हक्काचे घर

वर्सोवा - दहिसर कोस्टल रोड प्रकल्प सहा टप्प्यांत होपश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड, एस. व्ही. रोड या पूरक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. वर्सोवा ते दहिसर हा एकूण १८.४७ किमीचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे.

सहा टप्प्यांसाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्याचे काम सुमारे पाच हजार कोटींचे आहे. यापैकी बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमीचा एक उन्नत जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत जाता येणार आहे.

Mumbai Coastal Road:
Mumbai News : काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

तसेच गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा कनेक्टर तयार झाल्यानंतर थेट मुलुंड, ठाण्यापर्यंतही जाता येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मार्ग मिळणार आहेच, पण शहर आणि पूर्व उपनगरही जोडले जाईल.

वर्सोवा ते बांगूर नगर, बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड आणि जीएमएलआर तर चारकोप ते गोराई आणि दुसरा टप्पा गोराई ते दहिसर आणि तिस-या टप्प्यासाठी दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

Mumbai Coastal Road:
Mumbai News: पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन!

संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कामाचे स्वरूप

वर्सोवा ते दहिसर या मार्गासाठी सहा भाग करण्यात आले आहेत. त्यात वर्सोवा ते बांगूर नगर, बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड, माईंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा, चारकोप ते माईंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगदा, चारकोप ते गोराई आणि गोराई ते दहिसर ते भाईंदर असे सहा टप्प्यांत हे काम करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

Mumbai Coastal Road:
Mumbai News: कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच ओल्या आणि सुक्या कच-याचे होणार वर्गीकरण; पालिकेचा उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.