Mumbai : पश्चिम उपनगराला पावसाळ्यात दिलासा नाही! ३१ ठिकाणची कामे पुढील वर्षी

heavy rain
heavy rain sakal
Updated on

मुंबई - पश्चिम उपनगरांत आणखी ३१ ठिकाणी निरनिराळ्या उपाययोजना सुरू असून पुढील वर्षभरात त्या पूर्ण होतील. त्यामुळे यंदा कुठलाही दिलासा उपनगराला मिळणार नाही.

heavy rain
Raj Thackeray: महाराष्ट्र कशासाठी जगवलात? राज ठाकरे जेव्हा शिवरायांना फोन कॉल करतात

गोरेगाव (पूर्व) येथील स्क्वाटर कॉलनी परिसरात अस्तित्वात असलेली ६०० मिमी रुंदीची पर्जन्य जलवाहिनीची क्षमतावाढ करत ही जलवाहिनी १५०० मिमी रुंद क्षमतेची करण्यात आलेली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग ते लिंकिंग रोड दरम्यान असलेला जे. के. मेहता रस्ता व परिसर हा सखल भाग आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते.

काही सोसायटींमध्ये देखील पाणी भरते. त्याचा परिणाम सांताक्रुझ स्थानक परिसरापर्यंत होतो. यावर उपाय म्हणून जे. के. मेहता रस्त्यावरील ४३० मीटर लांबीची बॉक्स ड्रेन १.५ मीटर रूंदी वरून ३.० मीटर रूंदीची करण्यात आली आहे. त्यामुळे या भागाला दिलासा मिळेल. कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली मार्ग ते पश्चिम द्रुतगती मार्ग परिसरातील सखल भागात जास्त पाऊस झाल्यानंतर जलमय परिस्थिती निर्माण होते.

heavy rain
Pradip Kurundkar Case : तिच्या बोलण्यावर भाळला अन् नको ते सांगून बसला, DRDO चा शास्त्रज्ञ कसा फसला?

रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होतो. पर्जन्य जल वाहिनी विभागाकडून आकुर्ली मार्गावरील ठाकूर हाऊस व आकुर्ली मार्गावरील सार्वजनिक शौचालयासमोर बॉक्स ड्रेन रुंद करण्यात आले. तसेच आकुर्ली छेद मार्ग क्रमांक ३ येथील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या रुंद करण्यात आल्याचा फायदा होईल असा विश्वास पर्जन्य जलवाहिन्या खात्याने व्यक्त केला आहे.

कामे वगऴता 31 कामे वेगाने सुरू आहेत. त्या कामामध्ये बॉक्स् ड्रेनच्या कामाचा समावेश आहे. ही कामे पूर्ण 2024 च्या पावसाळ्याच्या आत पूर्ण होणार आहेत. पश्चिम उपनगरात उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करित असल्याचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले.

नाले स्वच्छता आणि रुंदीकरण तसेच खोलीकरण आणि विस्तारिकरणाची कामे पालिका क्षेत्रात सुरु आहेत. मुंबईतील सखल भागांमध्ये अंधेरी सबवे सह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.

- पी. वेलरासू , अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.