Mumbai News : त्यांनी त्यांच्या पप्पांना हा प्रश्न विचारला पाहिजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथे मंत्री एकनाथ शिंदे हे शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात
shrikant shinde
shrikant shinde sakal
Updated on

डोंबिवली -जे लोक सत्तेमध्ये मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे की त्यांनी अडीच दिवसांत कशाप्रकारे सरकारचा कारभार हाकला अशा खोचक शब्दात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नाशिक येथे आदित्य यांनी शिंदे यांना लक्ष करत शेतात ते हेलिकॉप्टर घेऊन जातात असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना डॉ. श्रीकांत यांनी शेतावर जाऊन लोकांना भेटा म्हणजे समजेल असा सल्ला देखील दिला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी शिवसेनेकडून शनिवारी मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या. या चाकरमान्यांना सोडण्यासाठी खासदार शिंदे डोंबिवलीत आले होते. यावेळी भाऊसाहेब चौधरी, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, माजी महापौर विनिता राणे,

विश्वनाथ राणे, सुजित नलावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कल्याण लोकसभा क्षेत्रातून खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल 580 बसेस सोडण्यात आल्या. डॉ. शिंदे यांनी शनिवारी या बसेसना भगवा झेंडा दाखवून बस कोकणाकडे रवाना केल्या.

shrikant shinde
Navi Mumbai Crime News : एका तासात दोन महिलांचे १ लाख ३५ हजाराचे दागिने लुबाडले !

यावेळी पत्रकारांशी बोलताना

आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथे मंत्री एकनाथ शिंदे हे शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात. तसेच होर्डिंग बॅनरबाजी वर सरकारी पैशांची उधळपट्टी सुरू आहे विकास काही होताना दिसत नाही असे विधान केले होते. आदित्य यांच्या विधानावर उत्तर देताना खासदार शिंदे यांनी त्यांनी त्यांच्या पप्पांनाच प्रश्न विचारावा असे म्हणत आदित्य यांच्यासह उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले आहे. खासदार शिंदे म्हणाले,

मला वाटतं जे लोक सत्तेमध्ये होते. जे मुख्यमंत्री अडीच वर्षांमध्ये फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे की, त त्यांनी अडीच दिवसांमध्ये कशाप्रकारे सरकारचा कारभार हाकला.

shrikant shinde
Solapur News : शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्याची गय केली जाणार नाही; समाधान आवताडे

मला वाटत त्यांनी आता बाहेर पडायला पाहिजे. ज्यांनी टीका केली पोस्टर बाजी होते, शेतावर जातात. त्यांनी शेतावर जाऊन, वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन लोकांना भेटल पाहिजे. आतापर्यंत लोकांना भेटले नाही, आता तरी जाऊन भेटाव. म्हणजे मागच्या सरकार आणि आताच्या सरकार मधला फरक त्यांना दिसेल. खाली जाऊन जोपर्यंत विचारत नाही लोकांना भेटत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही असे शिंदे म्हणाले.

shrikant shinde
Sangali Lezim Video : जल्लोषाची लेझीम! सांगलीतील विसावा मंडळाचा लेझीम सराव एकदा पाहाच

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा देण्यात आली. परंतु येताना त्याच कोकणवासी यांचे वाहन सेवा सुरळीत नसल्याने हाल होतात. याविषयी खासदार शिंदे यांना विचारले असता तशा प्रकारची सूचना आमच्याकडे आली तर त्यासाठी ही उपाययोजना करू असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.