मुंबईतील भांडूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, खुल्या गटारात बुडून दीड वर्षाच्या कृष्णा ओमप्रकाश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालिकेच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे, कारण वारंवार तक्रारी करूनही संबंधित गटार झाकले गेले नाही.