Mumbai : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका ऑक्टोबरअखेर सुरू होणार

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई - अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या किमान दोन मार्गिका ऑक्टोबर अखेर आणि संपूर्ण पूल डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Mumbai
Viral Video : मुंगसाच्या तावडीतून सुटला अन् झोपलेल्या बाळाच्या झोक्यात घुसला नाग; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पालिकेकडून करण्यात येत आहे. महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन सर्व संबंधित यंत्रणांची योग्य समन्वय राखून वेगाने या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

या प्रकल्पाच्या गतीवर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू हे स्वतः प्रकल्पास नियमितपणे भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहेत. प्रकल्पाच्या प्रगतीची वस्तुनिष्ठ माहिती प्रसारमाध्यमांच्या मदतीने जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे १ हजार २५० टन वजनाचा गर्डर महत्वाचा असणार आहे. या गर्डर साठी १ हजार २७० मेट्रिक टन पोलाद (स्टील) खरेदी करण्यात आले आहे.

एवढेच नव्हे तर, गर्डरची २५ टक्केपेक्षा अधिक जुळवाजुळव अंबाला येथील कारखान्यात पूर्ण झाली आहे. गर्डर बांधणीचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून ठरलेल्या वेळेत ते पूर्ण देखील होईल.

Mumbai
Aditya Thackeray : 'त्या' जाहिरातीची धास्ती! 'वर्धापनदिनाआधीच शिवसेनेला दिल्या शुभेच्छा'; आदित्य ठाकरेंचं वर्मावर बोट

पालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे तब्बल ८० टक्के काम देखील पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण होईल. याचाच अर्थ गोखले पुलाचा पहिला टप्पा दोन मार्गिकांच्या रुपात ऑक्टोबर २०२३ अखेर आणि संपूर्ण पूल डिसेंबर २०२३ अखेर सुरू होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

३. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने पर्यायी मार्ग सुरळीत राखले आहेत. भुयारी मार्गांमध्ये पावसाळ्यात पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा म्हणून पंपांची व्यवस्था केली आहे.

तसेच पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि इतर सर्व संबंधित यंत्रणांसोबत नियमित समन्वय राखला जात आहे. वेळापत्रकानुसार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.