MNS
MNS

Mumbai News : मनसेचे केडीएमसी मुख्यालयात अनोखे चॉकलेट आंदोलन; प्रसूतीगृहाच्या मुद्दावर आक्रमक

Published on

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील प्रसूतीगृहाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कल्याण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयाच्या गेटवर अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसेने गेटवर ठिय्या मांडत प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत चॉकलेट वाटप करत निषेध व्यक्त केला.

MNS
Ambadas Danave: "21 जून जगभरात 'गद्दार दिवस' साजरा व्हावा" दानवेंचं कोश्यारींना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयावर सोमवारी धडक दिली. गेल्या 15 वर्षापासून कल्याण पूर्वेत तळागळातील महिला वर्गासाठी प्रसूतीगृह होत नाही. प्रशासनाच्या या कारभारामुळे मनसेने मुख्यालय गेटवर ठिय्या देत चॉकलेट आदोलन करीत घोषणा बाजी केली.

केडीएमसी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या दालनात मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्यासमोर मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रसूतीगृह प्रश्नाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. कार्यकारी अभियंता यांनी निविदा प्रक्रियेनुसार येत्या 15 दिवसांत वर्क ऑर्डर निघणार असून कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले.

MNS
Shivsena Video : 'गुवाहाटी'ऐवजी अयोध्येत होणार होतं बंड; आदित्य ठाकरेंसोबत गेलेल्या आमदारांना तिथेच...

यावर पालिका अधिकारी कोरे यांना कार्यकर्त्यांनी चाँकलेट देत आश्वासनाची पूर्तता वेळेत करा अशी मागणी लावून धरत लेखी मागणी केली. या मागणीला कोरे यांनी दुजोरा दिल्याने अखेर मनसेने आंदोलन मागे घेतले.

यावेळी मनसे चे पदाधिकारी उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई, मनसे पदाधिकारी आदिसह महिला पदाधिकारी उर्मिला तांबे ,महिला पदाधिकारी तसेच मनसैनिक मनसे महिला आघाडी सदस्या उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.