मुंबईत मृत्यूचे प्रमाण वाढते, तर जन्मदरात घट; BMC आरोग्य विभागाची माहिती

BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) जन्मदर घटत (Birth Ratio increases) असतानाच मृत्यूदर वाढत (Death ratio increases) आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या (BMC health department report) आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. जन्मदरात घट आणि मृत्यूदर वाढण्यामागे कोरोना संसर्ग (corona infection) कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये जन्मदरात सुमारे 20 टक्के घट झाली असून मृत्यूदरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत 2018 पासूनच जन्मदरात घट दिसून येत आहे तर 2019 पासून मृत्यूदरात वाढ झाली आहे.

BMC
रोना विल्सन यांच्या मोबाईलमध्ये होते पेगॅसस; नव्‍या फॉरेन्सिक अहवालातील माहिती

2020 आणि 2021 मध्येही कोरोना संसर्गामुळे जन्मदरात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, 2018 पासूनच मुंबईतील जन्मदरात घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 2018 मध्ये 1,51,187 मुलांचा जन्म झाला. तर 2017 मध्ये 1,55,386 मुलांचा जन्म झाला. या संख्येची तुलना केली तर 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 4199 मुलांचा जन्म कमी झाला.

2019 मध्येही हीच परिस्थिती होती. 2019 मध्ये मुंबईत 1 लाख 48 हजार मुलांचा जन्म झाला. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 1,48,898 मुलांचा जन्म झाला असला तरी 2018 च्या तुलनेत 2289 मुलांचा जन्म कमी झाला आहे. 2020 या कोरोना काळात फक्त 1,20,188 मुलांचा जन्म झाला. 2021 मध्येही हीच परिस्थिती कायम राहिली. ऑक्टोबर 2021 पर्यंत, 89,292 मुलांचा जन्म झाला. 2020 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 99,113 मुलांचा जन्म झाला. या आकडेवारीवरून या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत 9811 मुलांचा जन्म कमी झाला आहे.

BMC
नवीन वर्षात लोकलमध्ये वाय-फाय सुविधा; १६५ लोकलमधील ३,४६५ डब्यांत सेवा

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, कोरोनाचा परिणाम जन्मदर आणि मृत्यूदरावर झाला आहे. मुंबईत जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त होता आणि कडक लॉकडाऊन होता, तेव्हा मोठ्या संख्येने लोक आपल्या कुटुंबासह शहराबाहेर गेले होते.  मुंबईत दरवर्षी सुमारे दीड लाख मुले जन्माला येतात. मात्र, लॉकडाऊनच्या वेळी कामगार वर्ग आपल्या कुटुंबासह सथलांतरीत झाले होते. परिस्थिती सुधारल्यावर ते मुंबईला परतले, पण त्याचे कुटुंब त्याच्यासोबत परतले नाही. त्यामुळे मुंबईत प्रसूतीचे प्रमाण घटले असून जन्मदरात घट झाली आहे.

या महिन्यात जन्मापेक्षा जास्त मृत्यू

2020 आणि 2021 मध्ये असे काही महिने होते जिथे जन्मापेक्षा जास्त मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सन 2020 मध्ये एप्रिल महिन्यात 7214 मुलांचा जन्म झाला होता, मात्र, याच्या तुलनेत या महिन्यात 7803 मुलांचा मृत्यू झाला. हा ट्रेंड मे, जून आणि जुलै महिन्यातही कायम राहिला. मे महिन्यात 9157 मुलांचा जन्म झाला तर 14,893 मुलांचा मृत्यू झाला. जूनमध्ये 10,866 मुलांचा जन्म झाला आणि 11998 मुलांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये 9003 बालकांचा जन्म झाला असून 9773 जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या जन्माच्या तुलनेत 2021 मध्ये ही मृत्यूची अधिक नोंद झाली आहे. या वर्षी मार्चमध्ये 7092 मुलांचा जन्म झाला असून 8550 मुलांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये 8100 मुलांचा जन्म झाला असून 15279 मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मे महिन्यात 7573 बालकांचा जन्म झाला असून 11691 मुलांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षित प्रसूतीचे महत्त्व वाढले

2015 मध्ये मुंबईत घरीच प्रसूतीची संख्या 1465 होती. त्यानंतर हे प्रमाण 2019 मध्ये घटून घरी फक्त 353 महिलांची प्रसूती झाली. 2020 मध्ये त्यात आणखी घट झाली. वर्षभरात केवळ 256 महिलांची प्रसूती त्यांच्या घरी झाली. यावर्षी केवळ काही प्रसूती झाल्या आहेत.

वर्ष         जन्म        मृत्यू

2017- 155386-89037

2018- 151187- 88852

2019- 148898- 91223

2020- 120188- 113172

2021 (ऑक्टोबर पर्यंत)- 89292- 85735

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.