केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षण 2021; मोठ्या शहरांमध्ये मुंबई अव्वल

Mumbai city award
Mumbai city awardsakal media
Updated on

मुंबई : केंद्र सरकारच्या (central government) स्वच्छ भारत सर्वेक्षण 2021 (India cleanest city completion) या स्पर्धेत 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबईने अव्वल क्रमांक (Mumbai ranks first) पटकावला आहे."नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी बद्दल आज दिल्ली (Delhi) येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबईचा गौरव (Mumbai greetings) करण्यात आला.

Mumbai city award
कल्याण : रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हा दाखल

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामार्फत दरवर्षी संपूर्ण देशातून स्वच्छतेची स्पर्धा घेतली जाते.यंदाच्या परीक्षेचे पुरस्कार वितरण आज दिल्ली येथे पार पडले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात मोठ्या शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल पालिकेचा गौरव करण्यात आला आहे. हे व्यवस्थापन अधिकाधिक सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून महानगरपालिकेने अनेक पावले उचलली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून लोकसहभाग देखील वाढवला आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते पालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे, भाग्यश्री कापसे, घन कचरा विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर,स्वच्छ भारत अभियानच्या कार्यकारी अभियंत्या अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पालिकेचा व्याप

मुंबईत 475 चौरस किलोमिटर क्षेत्रात जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट आहेत. त्यासोबत मुंबईला लागून असलेल्या इतर शहरांमधून दररोज नोकरी-व्यवसाय निमित्ताने कोट्यवधी नागरिक ये-जा करतात. ही सर्व व्याप्ती लक्षात घेतली तर दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे अवाढव्य लक्ष्य महानगरपालिका प्रशासनासमोर असते. दररोज 6 हजार 100 मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.