आयआयटी बॉम्बे मधील झाडांचा मारेकरी कोण ? कारवाईची 'या' संघटनांची मागणी

trees near IIT Bombay
trees near IIT Bombaysakal media
Updated on

मुंबई : आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) संस्थेच्या आवारातील अनेक झाडे सुकली (Trees drying) आहेत तर काही झाडे मेली आहेत. झाडांच्या मुळाशी फेकलेला राडारोडा यासाठी जबाबदार असल्याचा (Garbage) आरोप करत यावर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरण संघटनांनी (environment union) केली आहे.

trees near IIT Bombay
पालघर पोलिसांचं मिशन ऑलआऊट; विविध गुन्ह्यांतील 12 आरोपींना अटक

वनशक्ती संस्थेचे प्रमुख डी. स्टॅलिन यांनी याबाबत आयआयटी बॉम्बेच्या संचालकांना पत्र लिहून कळीत केले आहे. या तक्रारीत ते म्हणतात की संस्थेच्या परिसरातील एका बाजूकडील विविध झाडे मेली आहेत. काही झाडे सुकली असून याकडे तातडीने लक्ष देणे आहे. या परिसरात खूप कचरा टाकण्यात आला आहे असे दिसते. तसेच आवारातील अनेक जुनी आणि मोठी झाडे नष्ट झाली आहेत. जी झाडे अर्धमेली आहेत त्यांना जगवणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

या आवारात काही इमारती बांधणे प्रस्तावित आहे. त्यासाठी जमीन मोकळी करण्याचा हा कदाचित प्रयत्न असू शकतो असा आरोप ही स्टॅलिन यांनी केला आहे. येथील राडारोडा तसेच भंगार हटवा, झाडे पुनर्जीवित करा आणि मृत झाडांची भरपाई करण्यासाठी त्याऐवजी नवीन झाडे लावा अशा सुचनक ही त्यांनी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.