BMC : साथीच्या आजारांसह असंसर्गजन्य आजारांबद्दल जागृती

मुंबईकरांना देणार वॉर्डनिहाय आजारांची माहिती
BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : मुंबईतील नागरिकांमध्ये (people in mumbai) संसर्गजन्य (infectious and non infectious disease) आणि असंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूकता (Public awareness) वाढवण्यासाठी पालिका (BMC) प्रयत्नशील आहे. यासाठी लवकरच नवा उपक्रम (New campaign) पालिका वॉर्डमध्ये राबवण्यात येणार आहे. प्रभागनिहाय आजारांची माहिती, शिक्षण आणि संवाद कार्यक्रम नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबई पालिका राबवणार आहे.

BMC
डोंबिवली : दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक ; पिस्तूल जप्त

मलेरिया, डेंगी हे पावसाळी आजार आणि क्षयरोग, मधुमेह, कर्करोग, एड्स, उच्च रक्तदाब या सर्व आजारांची माहिती गोळा केली आहे. ही सर्व माहिती विविध माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे. आजाराचे स्वरूप, लक्षणे, उपचार, लक्षणांनंतरच्या चाचण्या, उपचारांसाठी काय केले पाहिजे, कोणत्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे, उपचारानंतर आहार आणि मानसिक स्वास्थ्य कसे असावे किंवा शारीरिक सुदृढता राहावी यासाठी काय केले पाहिजे, या सर्व गोष्टी या उपक्रमाअंतर्गत असणार आहेत.

एखाद्या वार्डमध्ये आजाराचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आजारांसंबंधी माहिती दिली जाईल. शिवाय, काही सामाजिक संस्थांनाही यात समावेश करून घेता येईल. एकूणच मुंबईकरांच्या आजारांविषयी पालिका आता अधिक सक्षमपणे विचार करत आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सायन रुग्णालयाच्या मदतीने पुस्तिका काढणार

सायन रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या सहकार्याने पालिका लवकरच एक पुस्तिका काढणार आहे. या पुस्तिकेत आजार, विषाणू आणि जीवनशैलीतील आवश्यक बदलांशी संबंधित शिक्षण आणि संवाद कार्यक्रमांची प्रभागनिहाय माहिती असेल. पालिकेने आजारांबद्दल वॉर्डनिहाय माहिती संकलित करण्याचीही योजना आखली आहे. यामुळे आरोग्य सुविधांमध्ये बदल करण्यास मदत करेल.

"एखाद्या व्यक्तीला आजार असेल तर त्याने ते कसे ओळखावे किंवा त्याचे उपचार कसे घ्यावे, चाचण्या काय करायला हव्यात? यात सर्व सामाजिक माध्यमांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय, माहिती पुस्तिकाही सर्व पालिका वार्डमध्ये वाटली जाईल. यातून नागरिकांना आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सोपे होईल. हा उपक्रम मुंबई केंद्रीत असून हेल्थ पोस्टची टीम, आरोग्य सेविकांच्या टीमची मदत घेतली जाईल."

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.