मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर BMC ठेवणार करडी नजर; 48 पथक सज्ज

Thirst First Parties
Thirst First Partiessakal media
Updated on

मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी (Thirty First December parties) राज्य सरकार (Maharashtra Government) स्वतंत्र नियमावली (Independent Rules) तयार करत आहे, असे संकेत महानगरपालिकेकडून (BMC) मिळत आहे. त्याचबरोबर नियमबाह्य पध्दतीने होणाऱ्या पार्ट्यांसाठी महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात दोन या प्रमाणे 48 टीम तयार केल्या आहेत.

Thirst First Parties
डोंबिवली : शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकास मारहाण; 15 जणांवर गुन्हा दाखल

नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार हॉटेल्स आणि बंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे. तर, खुल्या मैदानात ही मर्यादा 25 टक्के आहे. आतापर्यंत याच नियमाने कार्यक्रमांना मंजूरी दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पंचतारांकीत हॉटेल मध्ये नियम पायदळी तुडवून झालेल्या पार्टीवर पोलीस कारवाई झाल्यानंतर राज्य सरकारकडून आता खास थर्टी फस्टसाठी नवी नियमावली तयार केली जाण्याची शक्‍यता आहे.

राज्य सरकारकडून नवी नियमावली तयार केली जाण्याची शक्‍यता आहे. अथवा नोव्हेंबर महिन्यात प्रसिध्द झालेल्या नियमानुसारच कार्यक्रम होणे बंधनकारक आहे. असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. महानगरपालिकेने अशा कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन या प्रमाणे 48 टीम तयार केल्या आहेत. तसेच, गरज वाटल्यास या टीमची संख्याही वाढवण्याची तयारी असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

70 टक्के आरटीपीसीआर चाचण्या

नव्या नियमानुसार 70 टक्के आरटीपीसीआर चाचण्या आणि 30 टक्के रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्यानुसार चाचण्या केल्या जात आहे. टेस्ट किटची कोणतीही कमी नाही. ज्या व्यक्तींमध्ये लक्षणं आहेत अशांची चाचणी आवर्जून केली जाते. लांब पल्ल्याच्या गाड्या येणाऱ्या रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांचे स्क्रिनिंग करुन लक्षण असलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. हॉटेल्स, सभागृहांना नियमावली बाबत पुन्हा माहिती देण्यात आली आहे. त्यानंतरही नियम मोडले जात असतील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही काकाणी यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()