Mumbai News: अंधेरी, पार्ले व जोगेश्वरी भागात २९ व ३० मेला पाणी पुरवठा बंद

जलजोडणीच्या कामामुळे १६ तास पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम
Mumbai News: अंधेरी, पार्ले व जोगेश्वरी भागात २९ व ३० मेला पाणी पुरवठा बंद
Mumbai Newssakal
Updated on

Mumbai News के पूर्व विभागात मुख्य जलवाहिन्या जोडणी व जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्याच्या कामामुळे येत्या २९ व ३० मे दरम्यान १६ तासांच्या कालावधीत के पूर्व, के पश्चिम आणि पी दक्षिण विभागातील अंधेरी, पार्ले तसेच जोगेश्वरी परिसरात काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Mumbai News: अंधेरी, पार्ले व जोगेश्वरी भागात २९ व ३० मेला पाणी पुरवठा बंद
Mumbai News: मेट्रो स्थानक परिसरातील गटारांची दुरूस्ती कधी होणार?

पालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवारी, २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवारी, ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.

सदर काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुरुस्ती कालावधीत म्हणजे बुधवार, २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी जपून व काटकसरीने वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mumbai News: अंधेरी, पार्ले व जोगेश्वरी भागात २९ व ३० मेला पाणी पुरवठा बंद
Mumbai Local News: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

अंधेरी पूर्व विभागात पाणी बंद राहणार

त्रिपाठी नगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर वसाहत मातोश्री क्लब, दुर्गा नगर बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी,

जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्ले, पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर येथील पाणीपुरवठा बंद राहील.

Mumbai News: अंधेरी, पार्ले व जोगेश्वरी भागात २९ व ३० मेला पाणी पुरवठा बंद
Mumbai News: वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

गोरेगाव पश्चिम

बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. तर राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील पाणीपुरवठा बंद राहील.

........

अंधेरी पश्चिम

सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजारपेठ, भर्डावाडी, आंब्रे गार्डन, जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता ते जोगेश्वरी बस आगार), चार बंगला, डी. एन. नगर,

जुहू-वेसावे जोडरस्ता पाणीपुरवठा कमी प्रमाणात हेाईल. तर विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई उदयान, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर, विलेपार्ले झोन – के पश्चिम येथे पाणीपुरवठा बंद राहील.

Mumbai News: अंधेरी, पार्ले व जोगेश्वरी भागात २९ व ३० मेला पाणी पुरवठा बंद
Mumbai News : नाले सफाई ठेकेदाराचा गलथान कारभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.