Mumbai News: जलमार्गाची प्रवासी संख्या घटली; जाचक अटीमुळे वॉटर टॅक्सी चालविणे कठीण !

Mumbai News: जलमार्गाची प्रवासी संख्या घटली; जाचक अटीमुळे वॉटर टॅक्सी चालविणे कठीण !
Updated on

Mumbai News: एकीकडे जलमार्गाने मालवाहतुकीचा ग्राफ उंचावत जात आहे. तर दुसरीकडे जलमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्येच्या ग्राफ ढेपाळत जात आहे. गेल्या वर्षभरात तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त जलमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याची घटली आहे. त्यामुळे जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना बारगळ असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

वाहतूक कोंडीमुळे सध्या मुंबईपासून ते पार कल्याणपर्यंतचे नागरिक त्रस्त आहेत. उपनगरीय रेल्वेतही गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सागरमाला उपक्रमांतर्गत समुद्रकिनार्‍याचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आखली आहे. या योजनेतून मुंबईत गेल्या काही वर्षात वॉटर टॅक्सी आणि रोरो सेवा सुरु झाल्या आहे. सागरी महामंडळाच्या जाचक अटी आणि तिकीट दर महागडे असल्याने अनेक मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा बंद करण्यात आलेल्या आहे. त्यांच्या परिनाम थेट प्रवासी संख्येवर दिसून आले आहे.

२०२०-२१ मधील ८२ लाख प्रवाशांवरून २०२२- २३ या आर्थिक वर्षात १ .८७ कोटी प्रवाशांची संख्या पोहचली होती. विशेष म्हणजे १७ फेब्रुवारी २०२२ पासून मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सुरु करण्यात आली. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते मांडवा मार्गावर हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा सुरू झालेले आहे. तसेच भाऊंचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर रोरो बोटी सेवाला पर्यटकांचा आणि प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत होता.

परंतु, महागडे तिकीट आणि समुद्रात गाळ नियमितपणे काढत नसल्याने वॉटर टॅक्सी गाळात रुतत असल्याचा घटना घडल्या आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सीचे मोठे नुकसान होत असल्याने अनेक वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे १ कोटी ८७ लाख प्रवासी संख्यावरून गेल्या आर्थिक वर्षांत १ कोटी ८३ लाख प्रवासी संख्या आली आहे.

-----

ग्राफिक्स -

सागरी प्रवासी

२०२०-२१ -८२ लाख

२०२१-२२- १ कोटी. ३६ लाख

२०२२-२३ - १ कोटी ८७ लाख

२०२३-२४ १ कोटी ८३ लाख

-----

समुद्रातील गाळाचा त्रास

प्रवासी बोटी सुरक्षित आणि नियमित चालाव्यात, याकरिता मांडवा, मोरा, रेवस, आणि करंजादरम्यान दरवर्षी नियमितपणे कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी महामंडळाकडून समुद्रात साचलेला गाळ काढण्यात येतो. मात्र तरीही वांरवार गाळ साचत ओहोटीदरम्यान फेरी बोटी बंद कराव्या लागतात. गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील गाळ काढत नसल्याने बोटी गाळा रुतल्याचा घटना घडल्या आहे.

तसेच बेलापूरवरून चालणाऱ्या अनेक वॉटर टॅक्सी सुद्धा गाळामुळे खराब झाल्या आहे. तसेच सागरी महामंडळाच्या अनेक जाचक अटीमुळे अनेकांनी वॉटर टॅक्सीच्या व्यवसाय बंद केला. त्यामुळे प्रवासी संख्या दिसवसेंदिवस घट होत असल्याची माहिती वॉटर टॅक्सी मालकांनी सकाळशी बोलताना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.