पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'व्हेलटाइन डे' दिनानिमित्त वसई ते भाईदर दरम्यान अत्याधुनिक मिनी रोरो बोट सुरु होणार आहे. त्यामुळे वसई ते भाईंदर दरम्यान रस्त्यामार्गे वाहन चालकांना लागणार अंदाजित दीड तासांचा प्रवासाचा वेळ अवघ्या १५ मिनिटावर येणार असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
समुद्र किनाऱ्यांच्या विकास आणि जलवाहतूक प्रोत्सहन देण्यासाठी केंद्र सरकार सागरमाला उपक्रम हाती घेतला आहे. ह्या उपक्रमांतर्गत राज्य सरकारने विविध जलवाहतूक प्रकल्प हाती घेतले आहे. याच्या एक भाग म्हणून वसई आणि भाईंदरला रोरो जेट्टी उभारण्यात आले असून दिवाळी मिनी रोरो सेवा सुरु करण्याचे नियोजन महाराष्ट्र सागरी महामंडळाचे होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे मिनी रोरो बोट सुरू होण्यास विलंब झाला आहे. अखेर आता १३ फेब्रुवारी २०२४ रोजी मिनी रोरो बोटचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२४ अर्थात 'व्हेलटाइन'डेपासून प्रत्येक्षात प्रवाशांचा सेवेत ही बोट दाखल होणार आहे.
अशी असणार बोट-
या मिनी रोरो बोट चालविण्यासाठी खासगी कंपनीची सागरी महामंडळाने नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, ही छोटी रोरो बोटीची वाहन क्षमता ५० दुचाकी, ३० चारचाकी वाहनांची असणार आहे. तसेच प्रवासी क्षमता १०० पेक्षा जास्त असणार आहे. या मिनी रोरो बोटीची किंमत ६.२ कोटी रुपयांची असून कंपनीने रोरो बोटीला जान्हवी असे नाव ठेवण्यात आले आहे.
५० मिनिट वाचणार
वसई ते भाईंदर सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वसई ते भाईंदर रस्ते मार्गे साधारण ३८.२० किलोमीटर आहे. वाहनांना रस्ते मार्गाने
हे अंतर पार करण्यासाठी सव्वा तास ते दीड तास कालावधी लागतोय. मात्र, आता जलद मार्गाने हे अंतर अवघ्या ३.५७ किलोमीटर येणार आहे. त्यामुळे रोरो बोटीतून आपले वाहन घेऊन अवघ्या १५ मिनिटात प्रवाशांना वसई ते भाईंदर गाठता येणार आहे.
ग्राफिक्स -
-भाईंदर ते वसई रस्ते मार्ग अंतर ३८.२०किमी : वेळ - दीड तास
जलवाहतुकीचे अंतर ३.७५ किमी. वेळ - १५ मिनिट
- प्रवासवेळेत दीड तास बचत.
जेट्टी प्रवासी सुविधा -
रोरो बोटीची सेवा सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. वसई आणि भाईंदर
जेट्टी लंगत प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, शौचालय तसेच तिकीट बुकिंग काऊंटर उभारण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या चहा नाष्टासाठी कॅफेटेरिया उपलब्ध असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.