मुंबई : राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगर पालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांनी आज मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता आण्याचा निर्णय घेतला आहे.यात,समु्द्र किनारे,उद्याने,मैदाने खुली करण्या बरोबर विवाहाला उपस्थीत राहाण्याची मर्यादाही वाढविण्यात आली आहे.रात्रीची संचारबंदीही रद्द करण्यात आली आहे. तसे,परीपत्रक आज प्रसिध्द करण्यात आले आहे. ( Covid Relaxation In Mumbai)
कोविड प्रतिबंधक लसीकरण 80 टक्क्यांहून अधिक झालेल्या शहरातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्याबाबतचे अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते.त्यानुसार प्रशासनाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. समुद्रकिनारे, उद्याने, मैदाने नियमीत वेळे नुसार खुली राहाणार आहेत. विवाहांमध्ये खुल्या मैदानाच्या आणि हॉलच्या क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 यापैकी जे कमी असेल त्या क्षमतेने कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्याने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, समुद्र किनारे, गार्डन, पार्क सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, मैदानी खेळ- क्षमतेच्या 25 % पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. स्विमींग पुल, वॉटर पार्क 50 % क्षमतेनं सुरु राहणार आहेत. रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 % क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नव्याने जाहीर केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय लग्नकार्यात क्षमतेच्या 25 % किंवा 200 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
भजन, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना 50 % क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. स्पर्धात्मक खेळ आणि घोड्यांच्या शर्यतीसह इतर अशा स्पर्धांना 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी आहे. ही क्षमता निश्चित खुर्च्या किंवा आसन व्यवस्थेची क्षमता म्हणून घेतली जाते. उभी आणि फिरणारी गर्दी टाळली पाहिजे.असेही निर्देश प्रशासनाने दिले आहे.
महाराष्ट्रात आजपासून निर्बंध शिथिल; जाणून घ्या सुधारित आदेश
कोविड नियमावलीअंतर्गत १ फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता ५० टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता रात्रीच्या संचारबंदीबद्दलचे नियमही शिथिल करण्याचे अधिकार तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी आता २०० जणांना निमंत्रण देता येणार आहे. (Maharashtra govt announces relaxation in COVID restrictions)
राज्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर ठाकरे सरकारने १० जानेवारीपासून निर्बंध जारी केले होते. आता मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट आता उतरणीला लागली असून सोमवारी शहरात एक हजाराहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. तर पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून झपाट्याने कमी झाली. आठ दिवसांपूर्वी ९३ हजार ६४२ वर पोचलेली ही संख्या सोमवारी साठ हजारांच्या आत आली आहे. राज्यातील अन्य शहरांमध्येही हेच चित्र आहे. (Maharashtra Covid Update)
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा निर्बंध शिथिल केले आहेत. 1 फेब्रुवारी 2022 पासून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश लागू होणार आहेत. राज्यातील राष्ट्रीय उद्याने, सफारी नियमित वेळेनुसार सुरू होणार असून ज्या पर्यटनस्थळांवर तिकीट आहे ती देखील सुरू होणार आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सुधारित आदेशातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे... (Maharashtra reopen)
मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर आणि चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश. १८ वर्षांवरील ९० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस आणि ७० टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे.
कोरोनाची स्थिती पाहून दर आठवड्याला ही यादी अपडेट केली जाईल. या यादीचे निकषही परिस्थितीनुसार बदलले जातील.
अ वर्गातील जिल्ह्यांना काय दिलासा -
समुद्रकिनारे, उद्याने आणि पार्क हे स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील.
तरणतलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.