Mumbai North-West Lok Sabha 2024: उत्तर-पश्‍चिम मुंबईत शिवसेनेच्या दोन गटांतच लढत; अमोल कीर्तिकर यांना गोविंदा यांचे मोठे आव्हान मिळण्याची शक्यता

Mumbai North-West Lok Sabha 2024: आगामी निवडणुकीत कीर्तिकर पिता-पुत्र आमने-सामने येतील, अशी चर्चा होती. त्यात ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mumbai North-West Lok Sabha 2024
Mumbai North-West Lok Sabha 2024esakal
Updated on

Mumbai North-West Lok Sabha 2024: मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात (वायव्य मुंबई) मागील निवडणुकीत मोदी लाटेत खासदार गजानन कीर्तिकर विजयी झाले होते. आगामी निवडणुकीत कीर्तिकर पिता-पुत्र आमने-सामने येतील, अशी चर्चा होती. त्यात ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप युतीत हा मतदारसंघ शिंदे गटाला आला आहे. चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या मतदारसंघात गोविंदा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना गोविंदा यांचे मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

२०१९ चे चित्र

गजानन कीर्तिकर (शिवसेना) मते : ५,६९,०१८

संजय निरुपम (काँग्रेस) मते : ३,०९,५१७

सुरेश शेट्टी (वंचित बहुजन आघाडी) मते : २३,३६७

सुभाष पास (समाजवादी पक्ष) मते : ५,८४७

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,५९,५०१

Mumbai North-West Lok Sabha 2024
Kalyan Lok Sabha 2024: कल्याणमध्ये शिवसेनेच्या गटांत रस्सीखेच; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मविआला तगडा उमेदवार मिळेना?

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : काँग्रेस

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

Mumbai North-West Lok Sabha 2024
Parbhani Lok Sabha 2024: परभणीत मविआची सत्त्वपरीक्षा! भाजप, शिंदे गट व रासपत उमेदवारीवरून रस्सीखेच

सद्य:स्थिती

शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या प्रचाराला सुरुवात

कीर्तिकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ‘ईडी’ची चौकशी लागल्याने प्रचारकार्यात अडचणी

शिंदे गटाकडून अभिनेते गोविंदा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.

ठाकरे गटाकडून प्रचारासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू, तर शिंदे गटही प्रचारात तयारीने उतरण्याची शक्यता

Mumbai North-West Lok Sabha 2024
Mumbai South Lok Sabha 2024: दक्षिण मुंबईत शिवसेनेला अनुकूल वातावरण; हा मतदारसंघ मनसेसाठी सोडण्याची भाजपची तयारी

हे मुद्दे प्रभावी ठरणार

शिंदे सरकारने केलेल्या कामांसोबत मोदी सरकारच्या कामावर प्रचाराचा भर

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विकासकामांचा फायदा त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना होण्याची शक्यता

वाहतूक कोंडी, औद्योगिक वसाहतीतील प्रश्न, जोगेश्वरीतील चाळीचा प्रलंबित प्रश्‍न

Mumbai North-West Lok Sabha 2024
Mumbai North-East Lok Sabha 2024: ईशान्य मुंबईत महायुती, आघाडी थेट लढत; मनोज कोटक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.