मुंबई- राज्यातील महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा घटना कधी थांबतील, असा प्रश्न विचारला जात आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनामुळे राज्यात सध्या संतापाचे वातावरण असताना आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ओशिवरा परिसरात इमारतीच्या सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने खळबळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलीला बळजबरीने बाथरूममध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ३७ वर्षीय सुरक्षा रक्षकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.