Ravindra Chavan: वैतरणा नदीवरील पूलाचाप्रश्न मार्गी लागणार; रविंद्र चव्हाणांची ग्वाही

Palghar News: आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत येथे तातडीने कार्यवाही करण्याचे, आश्वासन दिल्याने, वैतरणा नदीवर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
Ravindra Chavan: वैतरणा नदीवरील पूलाचाप्रश्न मार्गी लागणार; रविंद्र चव्हाणांची ग्वाही
Updated on

Latest Mokhada News: मोखाड्यातील सावर्डे सह लगतच्या गावपाड्यांना तसेच शहापुर तालुक्यातील  दापुरे व सावरखुट येथील ग्रामस्थाना, वैतरणा नदीचा प्रवाह पार करून जावे लागते आहे. अनेकदा  मध्यवैतरणा जलाशयातुन, सावधानतेचा इशारा न देता पाण्याचा विसर्ग केला जातो आहे.

त्यामुळे सावर्डे, दापुरे व सावरखुट येथील अनेक आदिवासींन प्राण गमवावे लागलेले आहे. या घटनांची गंभीर दखल घेत, पालघर चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना येथे पुलं बांधण्यासाठी व नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या सुचना दिल्या आहेत. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत येथे तातडीने कार्यवाही करण्याचे, आश्वासन दिल्याने, वैतरणा नदीवर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  

Ravindra Chavan: वैतरणा नदीवरील पूलाचाप्रश्न मार्गी लागणार; रविंद्र चव्हाणांची ग्वाही
Ravindra Chavan : राजकोटमधील घटना वेदनादायी, दोषींवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्री चव्हाण यांचे आदेश

  सावर्डे येथील भास्कर नाथा पादीर यांचा  7  सप्टेंबर ला वैतरणा नदीचा प्रवाह पार करताना मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी तसेच अन्य मागण्यांसाठी येथील नागरीकांनी  30 सप्टेंबर ला मध्य वैतरणा प्रकल्पाच्या प्रवेश द्वारासमोर एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन केले होते.

                दरम्यान, भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे, जिल्हा सचिव विठ्ठल पाटील, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले, सावर्डे चे माजी सरपंच हनुमंत पादीर यांसह येथील नागरीकांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली असुन येथील गंभीर समस्येचे निवेदन दिले. त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना ग्रामस्थांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशीत केले. यावर आयुक्त भूषण गगराणी यांनी सावर्डे येथे नदीवर पुल व रस्ता तयार करण्यासाठी लवकरात लवकर मान्यता देणार असल्याची माहिती भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनी सकाळ ला सांगितले आहे. महापालीकेकडुन वैतरणा नदीवर पुलं बांधण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याने, येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Ravindra Chavan: वैतरणा नदीवरील पूलाचाप्रश्न मार्गी लागणार; रविंद्र चव्हाणांची ग्वाही
Ravindra Chavan : विधानसभेपुर्वीचे प्रत्येक सण राजकीय स्वरूपात साजरे करून वातावरण निर्मिती करा

ग्रामस्थांच्या मागण्या पुढील प्रमाणे - 

* मध्यवैतरणा धरणावर सावर्डे ते दापुरे दरम्यान कायम स्वरूपी पक्क्या बांधकामाचा पुल व रस्ता बांधुन देणे.

* जीवीत हानी झालेल्या मृताच्या कुटूंबांना भरीव अर्थिक सहाय्य व त्यांच्या पाल्यांना महानगर पालिकेत नोकरी देणे.

 * मध्यवैतरणा प्रवेशद्वारातुन मौजे सावर्डे, दापुरे व सावरखुट येथील ग्रामस्थांना पायी तसेच वाहनाद्वारे जाण्या-येण्यास परवानगी मिळणे,

* कायम स्वरुपी जीव रक्षक दल तैनात करणे.

* पाण्याचा विसर्ग करण्या अगोदर मौजे सावर्डे, दापुरे व सावरखुट तसेच धरणाखालील गावांना वयक्तिक दवंडी देणे व सायरण वाजविणे.

* दापुरे व सावर्डे हे धरणालगत गाव असल्याने या दोन्ही गावांना पाणी पुरवठा योजना मिळावी.

Ravindra Chavan: वैतरणा नदीवरील पूलाचाप्रश्न मार्गी लागणार; रविंद्र चव्हाणांची ग्वाही
Ravindra Chavan : राज्यमंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाचा शेकडो व्यापाऱ्यांसह भाजपात प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.