Shivsena : धनुष्यबाण गोठवल्यानंतर मिम्स व्हायरल; "आमची नवीन निशाणी रिक्षा..."

आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना फटकारले
Shivsena : धनुष्यबाण गोठवल्यानंतर मिम्स व्हायरल; "आमची नवीन निशाणी रिक्षा..."
Updated on

डोंबिवली : पालघर लोकसभा निवडणुकीत बविआचे शिट्टी चिन्ह गोठवून त्यांना रिक्षा चिन्ह आयोगाने बहाल केले होते. त्याचीच पुनरावृत्ती अंधेरी पोटनिवडणुकीत होणार? अशी चर्चा रंगली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असून या निर्णयानंतर आमची नविन निशाणी रिक्षा...यावर मिम्स तयार करून ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्षावाला हा विषय चांगलाच चर्चेला गेला होता. त्यानंतर आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर तोच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून यावरून ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे.

Shivsena : धनुष्यबाण गोठवल्यानंतर मिम्स व्हायरल; "आमची नवीन निशाणी रिक्षा..."
Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू; प्रथमेशची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. तसेच शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही हे ही आयोगाने स्पष्ट केले आहे. अंधेरी पोटनिवडणुकी पर्यंत हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवर असून शिंदे गटाचा उमेदवार नाही. यामुळे शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते. तर ठाकरे गटाला धक्का आहे. तर याचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार आहे.

Shivsena : धनुष्यबाण गोठवल्यानंतर मिम्स व्हायरल; "आमची नवीन निशाणी रिक्षा..."
Mumbai : रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचा सलग दुसरा अपघात

शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर समाज माध्यमावर मीन्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये "आमची नविन निशाणी रिक्षा" असा फोटो सर्वात जास्त व्हायरल होत असून तो साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला असे संबोधून डिवचले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देखील मिळाले होते. त्यांनतर रिक्षावाला हा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे चिन्ह गोठवल्यानंतर आमची नवीन निशाणी रिक्षा असे मिम्स व्हायरल करून ठाकरे गटाला लक्ष केले जात आहे.

Shivsena : धनुष्यबाण गोठवल्यानंतर मिम्स व्हायरल; "आमची नवीन निशाणी रिक्षा..."
Mumbai Rain : मुंबईसह डोंबिवली, ठाण्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

2019 च्या पालघरच्या लोकसभा निवडणूकीत तेथील स्थानिक पक्ष महाआघाडीतला बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह गोठवून त्यांना 'रिक्षा' हे चिन्ह बहाल करण्यात आले होते. याचीच पुनरावृत्ती होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.आमदार राजू पाटील यांनीही ठाकरे गटाला फटकारले. कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे.

Shivsena : धनुष्यबाण गोठवल्यानंतर मिम्स व्हायरल; "आमची नवीन निशाणी रिक्षा..."
Mumbai Accident : नजर हटी दुर्घटना घटी! वांद्रे येथे झालेल्या अपघाताचे कारण समोर

आमची निशाणी इंजिन असे म्हणत त्यांनी बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. 'त्यांची' जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती. असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही अशा कडव्या शब्दातील बोल त्यांनी ठाकरे यांना लागवले आहेत.यासर्व घडामोडी नंतर आता अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत ठाकरे गट कोणत्या नावाने व चिन्हाने जागा लढवितो व त्यात त्यांना यश येते का हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.