Grant Road Building Collapsed: मुंबईच्या ग्रँट रोड जवळ इमारतीचा भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Nana Chowk in Grant Road Mumbai building collapsed: इमारत जुनी असून काही भाग सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. बचावकार्य सुरु आहे.
 old building collapsed
old building collapsed
Updated on

मुंबई- मुंबईच्या ग्रँट रोडमधील नाना चौकात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. अनेकजण इमारतीमध्ये अडकल्याची माहिती आहे. एका महिलेचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात चार जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. इमारत जुनी असून काही भाग सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. बचावकार्य सुरु आहे.

घटनेची माहिती मिळताच मंत्री मंगलप्रभात लोढा घटनास्थळी आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४० जण आत अडकले आहेत. काहींना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता आहे.

 old building collapsed
Navi Mumbai: अविवाहित असताना गरोदर असल्याचं लपवलं, तरुणीचा बाथरूममध्येच मृत्यू, बाळ सुखरूप

एका तासाच्या आत सर्वजणांना बाहेर काढले जाईल. प्रशासनाने इमारतीला धोकादायक जाहीर केलं होतं. पण, काही लोक तेथेच राहिले होते. आतापर्यंत जीविनहानीची माहिती नाही. पण, काहीजण जखमी झाले आहेत. युद्धपातळीवर अग्निशमन दलाचे जवान जखमींना बाहेर काढण्याचं काम करत आहेत, असं मंगलप्रभात लोढे म्हणाले.

 old building collapsed
Mumbai Rain Update: मुंबईकरांसाठी आज पुन्हा मनस्तापाचा दिवस; तिन्ही लोकल सेवेकर काय झालाय परिणाम? नोकरदारांचे हाल

सहा महिन्यापूर्वी प्रशासनाने या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केलं होतं. तरी देखील अनेक रहिवाशांनी इमारत सोडली नव्हती. घटनेमध्ये जखमींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाचा जोर कामय असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. पावसामुळे इमारतीचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.