मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. काही राजकीय पक्षांनी सूचना पाठवण्याची मागणी पालिकेकडे केली होती.
सन २०२३-२४ या वर्षाकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. सदर अर्थसंकल्पीय अंदाज दिनांक ५ फेब्रुवारी, २०२३ पूर्वी सादर करण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने बृहन्मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी दिनांक २८ जानेवारी, २०२३ पर्यंत ई-मेल आयडी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in यावर सदर सूचना पाठवाव्यात. तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील तर त्यांनी दिनांक २८ जानेवारी, २०२३ पर्यंत खालील पत्यावर पाठवाव्यात, असेही आवाहन पालिकेने केले आहे.
पत्ताः
प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय,
चौथा मजला, विस्तारीत इमारत,
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.