'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे'! प्रवाशामुळे विमानाची मुंबईत इमर्जंसी लँडिंग, औषधामुळे बरळल्याचा कुटुंबाचा दावा
Mumbai Plane Emergency Landing: पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या अकासा एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांच्या छातीत दुखू लागल्याने मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर त्या प्रवाशाने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती विमान कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर विमानतळावर खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अकासा एअरलाईन्सचे फ्लाईट क्रमांक क्यूपी ११४८ हे विमान शुक्रवारी रात्री पुण्याहून १८५ प्रवासी घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले होते; मात्र विमानाचे उड्डाण होताच एका प्रवाशाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे विमान तत्काळ मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)
विमान मुंबई विमानतळावर उतरविल्यावर त्याने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रवाशाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. औषधांच्या प्रभावामुळे तो असे बरळत असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत. रुग्ण प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.