मुंबई : कारमध्ये लपवला ११५ किलो गांजा; पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

Drug crime
Drug crimesakal media
Updated on

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गाडीतून तस्करी कराताना पोलिसांना अंमली पदार्थ (Ganja smuggling) सापडू नये यासाठी एका कारमध्ये काही बदल करण्यात आले होते, ही बदल करुन घेतलेली कार गांजा अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापरली जात असल्याची बाब मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या निदर्शनास आली. अंमली पदार्थ विरोधी पथकानं (ANC) या कारमधून 115 किलो गांजा जप्त (Ganja seized) केला आहे. तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इम्रान अबरार हुस्सैन अन्सारी (42) आणि इस्माईल सलिम शेख (21) अशी अटक (Two culprit arrested) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Mumbai police anti narcotic cell arrested two culprit and seized one hundred and fifteen kg ganja)

Drug crime
मोरोशी भैरवगडाची कठीण 450 फूट प्रस्तर भिंत 10 तासांत सर

महाराष्ट्रात ओडीसामधून मोठ्या प्रमाणावर गांजा तस्करी करुन आणला जात असल्याची बातमी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटचे पोलिस निरीक्षक रुपेश नाईक यांना मिळाली होती, त्यानुसार घाटकोपरच्या बस आगार परिसरात सापळा रचण्यात आला, काही वेळातच माहिती मिळालेली गाडी (ग्रे रंगाची होंडा अकॉर्ड MH02, AV 4878) पोलिसांना दिसली, शिताफीने ती कार बाजूला घेऊन तीची तपासणी करण्यात आली, पण प्रथमदर्शनी कारमध्ये काहीही आढशून आले नाही, तेव्हा पोलिसांनी गाडी निट तपासली तेव्हा गाडीत अनेक ठिकाणी पोकळ्या तयार करुन त्यात अंमली पदार्थ लपवलेले असल्याचे समोर आले.

गाडीच्या मागच्या दरवाजांच्या विंडो ग्लाची खालची बाजू, गाडीचे मागचे सीट, तसेच गाडीच्या डिक्कीच्या टेल लाईच्या मागे अशा पोकळ्या तयार करुन गांचाचे पॅकेटस लपवलेले पोलिसांना आढळून आले. गाडीतून पोलिसांनी 115 किलो गांजा जप्त केला, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 28 लाख 75 हजार इतकी आहे. ही गाडी ओडूसामधूनच खास तस्करीसाठी अशी बनवून घेण्यात आल्याची माहीती आरोपींनी पोलिसांना दिली. दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(क)आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी इस्माईल सलिम शेख याच्यावर मुंबईच्या आरे पोलिस स्टेशनमध्ये याआधीS2020 मध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत तर 2021 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.