मुंबई : पोलिसांनी केले तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक

नववर्षाच्या मेजवानीसाठी केली जात होती ड्रग्जची विक्री
Culprit arrested
Culprit arrestedsakal media
Updated on

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) अंमली पदार्थ विरोधी पथकानं (Anti narcotic cell) मोठी कारवाई करत 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त (three crore drug seized) केले आहेत. या प्रकरणी तीन नायजेरियन नागरिकांना अटक (Three Nigerian culprit arrested) करण्यात आली आहे. मुंबईतल्या बांद्रा मधल्या टाटा वसाहत परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. हे अंमली पदार्थ 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी विकले जात होते. (Mumbai police arrested three Nigerian culprits in drugs crime and seized three crore drugs)

Culprit arrested
नव्या वर्षात नवं टेन्शन; मुंबईतील हवा बिघडली!

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटमधल्या पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भोये यांची टिम बांद्रा कुर्ला संकुल रोडवर गस्त घालत असताना त्यांना एक नायजेरियन नागरिक संशयास्पदरित्या फिरताना दिसला. इबे चिनाडू माईक असं त्याचं नाव आहे. या टिमनं त्याला हटकलं तेव्हा त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून त़्याच्या बॅगेत काय आहे विचारलं तेव्हा त्यानं बॅगेत कोकेन आणि एमडी ड्रग असल्याचं सांगितलं.

त्याच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा बॅगेत 105 ग्रॅम कोकेन आणि 120 ग्रॅम एमडी ड्रग टिमला सापडलं. ते कुठून आणलं हे विचारलं तेव्हा त़्यानं त्याच्या दोन साथीदारांची नावं आणि ठिकाणं सांगितली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमनं वाशी टोल नाक्याजवळून दोघांना ताब्यात घेतलं, ओडीफे आणि मंडे अशी त्या दोघांची नावं आहेत. ओडीफेकडून 120 ग्रॅम कोकेन आणि 850 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे. तीघांकडूनही जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 3 कोटी रुपये इतकी आहे.

तिघंही नायजेरीयन नागरीक मुंबईतल्या उच्चभ्रु लोकांना अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तिघांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. तिनही ड्रग पेडलर्सवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 21(क), 22(क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.