मुंबई : लॉकडाऊन अजूनही सुरु आहे. अनलॉक जरी सुरु झाला असला तरीही लोकल ट्रेन मात्र सर्वांसाठी सुरु झालेली नाही. अशात केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना विशेष QR कोड देऊन प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करता यावा म्हणून आता खोटे QR देखील बनवून दिले जातायत. पाचशे ते हजार रुपयांना हे QR कोड बनवून दिले जातायत. मुंबईतील पोलिसांनी विशेष कारवाई करत खोटे QR बनवून देणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला गजाआड केलंय. ज्यांनी या बनावट क्यू आर कोड वापरून ट्रेनमधून प्रवास केलेला आहे त्याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या मास्टरमाईंडचं नाव अनिस राठोड असं आहे.
महत्त्वाची बातमी : आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल
खोटे QR बनवून देणार अनिस याला पोलिसांनी ताब्यात घातलंय. काही बनावट पासवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चौकशी केल्यानंतर अनिस याचं समोर आलेलं. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत अनिस याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनिस हा मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहणारा आहे. अवघ्या पाचशे ते हजार रुपयांमध्ये बनावट QR चे पासेस बनवून देत असत. वडाळा पोलिस स्टेशनवर काही प्रवाशांवर पोलिसांना आल्यांनतर त्यांची चौकशी केली गेली त्यानानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी अनिस याच्या घरातील बनावट पास बनवण्याचं साहित्य ताब्यात घेतलंय.
महत्त्वाची बातमी : बेस्टच्या मदतीला धावणार ST, नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईत 1 हजार बसेस धावणार
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईतील लोकल ट्रेन, मुंबईची लाईफलाईन बंद होती. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी ट्रेन्स सुरु झाल्यात. खास QR कोड असेलेले पास देऊन अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी देण्यात आली.
mumbai police caught master mind who used to made fake QR code passes for train travel
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.