मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

police tweet
police tweet
Updated on

मुंबई : आऊट ऑफ द बॉक्स जाऊन मुंबई पोलिस लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या आधारे मुंबई पोलिस नेहमीच जनजागृती करत असतात. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, तेव्हापासून आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी पोलिस मजेदार आणि माहितीपूर्ण मीम्स सुद्धा शेअर करत आहेत. पोलिसांच्या या पोस्टचं नेटिझन्सने भरभरुन कौतुक करत आहेत. 

मुंबई आयुक्तांच्या ट्विटरवरील लेटेस्ट पोस्ट कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात एक जबाबदार नागरिक असल्याची जाणीव करुन देते. 


त्यांच्या पोस्टमध्ये  कॅप्चा (Completely Automated Public Turing Test To Tell Computers and Humans Apart) चा नमुना दर्शविते, जे वापरकर्त्यांना एकसारख्या दिसणार्‍या वस्तू ओळखण्यास सांगत आहे. त्यात मास्क, ग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझरच्या बाटलीचा फोटो दिसत आहे. नमुन्याखाली एक चेकबॉक्स आहे आणि त्याच्या बाजूला मी एक जबाबदार नागरिक आहे. असं लिहिलं आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, आम्हाला समजले, सुरक्षेचा कॅप्चा...

बुधवारी शेअर केलेल्या पोस्टला आतापर्यंत 357 लाईक्स मिळाले असून 25 जणांनी ही ट्विट रिट्विट केलं. अनेकांनी पोस्टवर कंमेट केली असून, कोरोना व्हायरससारख्या संकट काळात पोलिस विभागाने नागरिकांच्या सेवेठी शहरात ज्या पद्धतीनं कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक. बॉलिवूड आणि सोशल मीडिया ट्रेंडशिवाय, पोलिस विभागाने फुटबॉलमधील लोकप्रिय नियमांकडे लक्ष वेधले आहे. पोस्टमध्ये पोलिसांनी एखाद्या खेळाडूला त्यांच्या चुकीच्या खेळाचा निर्णय देण्यासाठी लाल कार्ड दाखवलं आहे.


मुंबई पोलिस आयुक्तांनी ट्विटरवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी  घरी राहून लोकांना व्हायरसला ‘रेड कार्ड दाखवा’ अशी आवाहन केलं आहे. पोस्टमध्ये रेड कार्ड असलेल्या रेफरीची हात दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की,  Tackling' safety is against the rule books. आवश्यकते शिवाय बाहेर न पडता व्हायरसला लाल कार्ड दर्शवा. पुढे त्यांनी हॅगटॅग बूकदव्हायरस असा शब्दही वापरला आहे. 

लॉकडाऊन असेल, पण पोटाला कुलुप कसे लावणार? अनेकांनी शोधला वेगळा मार्ग

मंगळवारी शेअर केलेल्या पोस्टला आतापर्यंत 402 लाईक्स मिळाले असून 44 जणांनी हे ट्विट रिट्वीट केलं आहे. ही पोस्ट मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या पेजवर पुन्हा रिट्विट केली. तसंच या पोस्ट त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील शेअर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.