आता डिलिव्हरी बॉयवर मुंबई पोलिसांची करडी नजर

डिलिव्हरी बॉय एखाद्या गुन्ह्यांत सहभागी आढळल्यास कंपनीलाही जबाबदार धरण्यात येईल
mumbai police
mumbai police
Updated on
Summary

डिलिव्हरी बॉय एखाद्या गुन्ह्यांत सहभागी आढळल्यास कंपनीलाही जबाबदार धरण्यात येईल

मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) डिलिव्हरी बॉयबाबत (Delivery Boy) कडक संदेश पाठवण्यात आला आहे. कुरियर, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजची (Deliveyr Boy) नियुक्ती करताना त्यांचा चारित्र्य पडताळनीचा अहवाल असणे आवश्यक आहे. चारित्र्य पडताळणी न केलेला डिलिव्हरी बॉय एखाद्या गुन्ह्यांत सहभागी आढळल्यास कंपनीलाही जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी दिल्या आहेत.

mumbai police
'पंतप्रधानांवर बोललं तर देशद्रोहाचा गुन्हा, मुख्यमंत्र्यांवरही कोणी बोलू नये'

मुंबई पोलिस प्रमुखांनी कुरिअर सेवा, ऑनलाइन विक्री आणि खाद्यपदार्थ वितरण या क्षेत्रातील सुमारे 30 कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यादरम्यान संबंधित कंपनींनी डिलिव्हरी बॉईजना प्रशिक्षण देण्याचे आणि डिलिव्हरीसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीवर आणि नियमाचे उल्लंघन करत नाहीत यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डिलिव्हरी वेळेवर न दिल्याने डिलिव्हरी बॉयच्या पगारावर परिणाम होत असल्याने मुंबई पोलिसांनी सूचना दिली आहे.

कंपनीवरही कडक कारवाई होणार

वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना कोणताही डिलिव्हरी बॉय पकडला गेला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईलच, शिवाय हा मुलगा ज्या कंपनीत काम करतो, त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रमुखांनी यावेळी सांगितले आहे. तसेच, कुरिअर बॉईजने केलेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या पाहता, कंपन्यांनी त्यांना कामावरती घेताना त्यांची पूर्ववर्ती योग्यरित्या तपासणी करावी आणि त्यांना योग्य पोशाख प्रदान करावे याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

mumbai police
'फडणवीसांकडे किती बॉम्ब आहेत अन् ते कशावर फोडणार त्यांनाच माहिती'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.