पोलिसाने बाईक अडवून सोन्याने भरलेली बॅग ताब्यात घेतली आणि त्यानंतर...

नेमकं काय घडलं?
pune nakabandi
pune nakabandiFile photo
Updated on

मुंबई: भायखळ्यात एका ज्वेलर्सची १.२५ कोटी रुपयांना फसवणूक (cheating with jeweller) केल्याप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai police) दलातील एका कॉन्स्टेबलसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. खलिल कादर शेख (४७), रविंद्र कुंचीकुर्वे (36) आणि संतोष नाकते (27) अशी आरोपींची नावे आहेत. या कटात ज्वेलर्सच्या दुकानाचा मॅनेजरही सहभागी आहे. भायखळा पोलीस कॉलनीजवळ सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. (mumbai Police constable held for cheating jeweller of gold worth rs 1.25 crore in byculla)

भारत जैन (५६) हे दुचाकीवरुन आपल्या सहकाऱ्यासह सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी चालले होते. त्यावेळी मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एकाने पोलीस गणवेश परिधान केला होता. पोलिसी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याला बाईकची कागदपत्रे दाखवायला सांगितली. एकजण कागदपत्र तपासत होता. त्याचवेळी बॅगेचीही झाडाझडती घेतली. बॅगेमध्ये अडीच किलो सोने असल्याचे पाहून याची पोलिस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल, असे सांगून सोने घेऊन गेले ते पुन्हा परतलेच नाहीत.

pune nakabandi
BMC थेट रेड्डीजकडून लस का घेत नाही? मधले दलाल कशासाठी - मनसे

जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याने नंतर भायखळा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तपास सुरु केला. गुन्ह्यात वापरलेल्या दोन बाईक्सच्या नंबर प्लेटस तपासल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाडाझडती घेतली असता दुचाकीचे नंबर मिळाले. या नंबरवरून पोलिसांनी शिवडी आणि नायगाव परिसरातून खलील शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तर भायखळा पोलिसांनी जैन यांचा मित्र मिलेश कांबळे याला पकडले. मिलेशने दिलेल्या माहितीवरूनच हा सर्व कट रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.