Mumbai Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची फोनवर धमकी…; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंदर्भात फोन कॉल आला असून त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली
mumbai police control got threat of blast force on alert mode
mumbai police control got threat of blast force on alert modeesakal
Updated on

Mumbai News : मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांकडे आली असून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंदर्भात एक निनावी फोन कॉल आला असून त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमाजतनरास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन कॉल आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार आहोत, अशी धमकी देणारा फोन कॉल शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न कंट्रोल रूममधील पोलीस कर्मचाऱ्यानं केला.

मात्र, धमकी दिल्यानंतर तातडीने फोनकॉल करणाऱ्याने कॉल कट केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तसेच फोन करणाऱ्याच्या बाबतीत इतर माहिती पोलीस गोळा करत असून हा फोन नेमका कुठून आला याचा शोध पोलीस घेत आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

अफवांच्या बाजारात उधाण

मुंबई पोलिसांना यावर्षी 100 हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा अफवा/धमकीचे कॉलच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 99% आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणांमध्ये खोटी माहिती प्रसारित करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होतात.

आरोपींना अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत आहे.अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवर विनाकारण ताण येत आहे.

मंत्रालयात बॉम्ब

सप्टेंबर महिन्यात काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी 112 क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलणे करून दिले नाही,

तर बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली.

नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केलानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

38 वेळा महिलेकडून धमकी

मुंबईमध्ये कामाठीपुरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा मुंबई पोलिसांना फोन आला. हा फोन एका महिलेने केला होता. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात महिलेने अशाच प्रकारे तब्बल 38 वेळा फोन करून अफवा पसरवल्याचे तपासातून निष्पन्न झाले .

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या या महिलेची मानसिक परिस्थिती स्थिर नसल्यामुळे 38 वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. याशिवाय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या अजून एका महिलेने 110 वेळा मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून खोटी माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.