Mumbai Police Crime: अरे बापरे ; पोलिसालाच घातला ३२ लाखाचा गंडा

mumbai police
mumbai police
Updated on

Mumbai Police Crime: फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एका व्यक्तीने नवी मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला ३२ लाख ५० हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अरुण सालियन (५३) नामक व्यक्तीवर एनआरआय पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

सीवूड्स सेक्टर-४८ मध्ये राहणारे पोलिस हवालदार यांनी २०१८ मध्ये ईव्ही रेसिडेन्सी इमारतीतील फ्लॅट ६३ लाखांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार त्यांनी एमअयोयू करत प्रथम ५ लाख रुपये रोख, नंतर ३२ लाख रुपये टप्प्याटप्प्याने दिले होते. त्यानंतर पोलिसाने फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अरुण सालियन याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली; मात्र त्याने कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली.

त्यानंतर कोरोना काळातील लॉकडाऊनमध्येही तक्रारदाराने सालियन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी टाळाटाळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तक्रारदाराने सीवूड्समधील ईव्ही रेसिडेन्सी इमारतीत जाऊन चौकशी केली असता, अरुण सालियन याने फ्लॅट दुसऱ्याच महिलेला विकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसाने सालियन यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mumbai police
Mumbai News : मुंबई विमानतळाबाहेर ड्युटीवरील CISF जवानाला 'बीएमडब्लू'ने उडवलं; १९ वर्षीय मुलगा ताब्यात

समझोता कराराचे उल्लंघन

मार्च २०२३ मध्ये सालियन आणि पोलिस यांच्यामध्ये झालेल्या समझोता करारानुसार सालियन याने पोलिसाच्या पत्नीच्या नावे २० लाख रुपये देण्याचे मान्य करून त्यांना पीडीसी चेक दिला; मात्र चेकदेखील वटला नाही. त्यानंतर अरुण सालियन हा फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पोलिसाने एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

mumbai police
Mumbai News : रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल; मालगाडीच्या अपघातामुळे ५२ मेल- एक्सप्रेस गाड्या फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.