Mumbai Crime : रस्त्यावर तलवारीने केक कापत भाईचा वाढदिवस अन् हाती पोलिसांच्या बेड्या

केक कापून काही तास उलटत नाही तोच पोलिसांनी सदर तरुणावर कारवाई करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या तरुणाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Crime
Mumbai Crime sakal
Updated on

Mumbai Crime - शस्त्र हातात घेऊन केक कापणे, वरातीत नाचणे त्याचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले असता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. हे माहीत असूनही डोंबिवली मध्ये एका तरुणाने भर रस्त्यात हातात तलवार घेत तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

केक कापून काही तास उलटत नाही तोच पोलिसांनी सदर तरुणावर कारवाई करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या तरुणाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. ईरफान दस्तगीर जमादार (वय 20) याच्यावर टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Mumbai Crime
Pune News : अर्थव्यवस्थेवरचा ताण विचारात घेतल्याशिवाय लोकप्रिय घोषणा करता येणार नाहीत - अजित पवार

ईरफान हा कचोरे येथील हनुमान नगर परिसरात राहण्यास आहे. रविवारी त्याचा वाढदिवस होता. रात्री 11.30 वाजता ईरफानने आपल्या मित्रांसोबत कचोरे येथेच 90 फिट रोडवरील साई श्रद्धा केबल नेटवर्क ऑफिससमोर आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी रस्त्यावरच हातात तलवार घेत या तलवारीने त्याने वाढदिवसाचा केक कापला. भाईचा वाढदिवस थाटामाटात साजरा झाल्यानंतर त्याच्या मित्र मंडळींनी त्याचे व्हिडीओ बनवून ते सोशस मिडीयावर व्हायरल केले.

Mumbai Crime
Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?

विशेष म्हणजे हा वाढदिवस रात्रीच्या वेळेस साजरा होत असतानाच हाकेच्या अंतरावर कचोरे पोलिस चौकी आहे, परंतू पोलिसांच्या ही बाब लक्षात आली नाही. संबंधित तरुण हा केबल व्यावसायिकाचा मुलगा असून परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तो नेहमीच अशा प्रकारचे कृत्य करीत असल्याची स्थानिक रहिवाशांमध्ये चर्चा आहे.

सदर वाढदिवासाच व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच टिळकनगर पोलिस ठाण्यातील गोपनीय पथकाने व्हिडीओची शहनिशा केली. 90 फिट रोडवरील हा व्हिडीओ असल्याचे तसेच सदर तरुणाची ओळख पटल्यानंतर त्याला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी सांगितले.

Mumbai Crime
Mumbai Crime: जीव वाचविण्यासाठी धावाधाव मात्र.. डोंबिवलीत भर रस्त्यात रिक्षाचालकाची हत्या CCTV Video

हातात बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगून स्वतःचे वर्चस्व व प्रभूत्व निर्माण व्हावे त्याची प्रतिष्ठा प्रस्थापित व्हावी म्हणून हातात तलवारी सारखे घातक शस्त्र घेऊन ती हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करणे. अवैध हत्यारांच्या जमाबंदीचा आणि शस्त्र बाळगण्याबाबत मनाई आदेश असताना देखील त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईरफान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आफळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.