बोगस कॉल सेंटर, व्हायग्रा आणि अमेरिकन नागरीक 

बोगस कॉल सेंटर, व्हायग्रा आणि अमेरिकन नागरीक 
Updated on

मुंबई : बोगस कॉल सेंटरच्या सहाय्याने प्रतिबंधीत वायग्रा औषधे अमेरिकी नागरिकांना विकणाऱ्या 
दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भारतातूनच ही औषधे ऑनलाईन पद्धतीने विकत होते. याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करित आहेत. 

मुदस्सर मकंदर (34) आणि ऍशलेजेनेट डिसोझा (39)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दोनही आरोपींना न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अंधेरी येथील सुमेर प्लाझाच्या तिसऱ्या माळ्यावर एएमएम कॉल कलेक्‍ट प्रा. लि. नावाचे कॉल सेंटर आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना वायग्रा, ड्रामाडोल, प्रोपेसिया, सोमा आणि अमास्किलीन यासारखे प्रतिबंधीत औषधे ऑनलाईन पद्धतीने विकण्यात येत होती.

औषधे विकण्याच्या बदल्यात ऑनलाईन पैसे घेऊन अमेरिकी नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. संबधित कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांना दोघांना अटक केली. आरोपी वाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या (व्हीओआयापी) च्या माध्यामातून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधत असल्याची माहिती, पोलिस निरीक्षक सुनिल माने यांनी दिली आहे. 

दोघा ठगांची बनवाबनवी 
अमेरिकी नागरिकांशी संपर्क केल्यानंतर ग्राहकांना "मॅजिक जॅक गो'च्या माध्यामातून एक नंबर दिला जात होता. अमेरिकी नागरिक वायग्रा खरेदी करण्याच्या नादात परदेशी चलन ऑनलाईन बॅंकिंगद्वारे पाठवित होते. आरोपींना पैसे मिळाल्यानंतर औषधे न पाठवता त्यांची फसवणूक करीत होते.  

mumbai police found bogus call center and sale of fake medicines fake from mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.