मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत सेक्स रॅकेटच्या घटना समोर येताना पाहायला मिळतायत वाचायला मिळतायत. त्यातच आता पोलिसांनीही अश्या प्रकारच्या घटनांमध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या वर्सोवामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्सोवामधून २ परदेशी तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. एकूण ३ तरुणींची सुटका या सेक्स रॅकेटमधून करण्यात आली आहे. ज्यात एक भारतीय तरुणी तर दोन तरुणी या परदेशातील आहेत.
दोन्ही तरुणी स्टुडंट-व्हिसावर पुणे विद्यापीठात शिक्षण घेत होत्या. मुंबई पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सेक्स रॅकेटवर कारवाई करत दोघींची मुक्तता केली आहे. एकूण तीन मुलींची सुटका यामध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी एक भारतीय आहे. पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नावेद सव्वीस वर्षीय अख्तर आणि बावीस वर्षीय नाविद सय्यद या दोन दलालांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत वेश्या व्यवसाय करणारी महिला फरार झाली आहे.
कशी झाली सुटका ?
वर्सोवामधील एका फ्लॅटमध्ये सुटका झालेल्या मुलींना ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून या दलालांना फसवलं आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या सेक्स रॅकेटमध्ये प्रत्येक मुलीच्या बदल्यात दलाल 40 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी : मंगलप्रभात लोढा यांची फडणवीस करणार हकालपट्टी ?
काहीच दिवसांपूर्वी झाली होती अशी घटना:
चारच दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अंधेरीमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. पोलिसांनी धाड टाकून महिलेला अटक केली होती. या सेक्स रॅकेटमधून तीन महिला कलाकारांची सुटका करण्यात आली होती.
mumbai police human trafficking department rescued three girls of pune from s3x racket
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.