Ganesh Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था

आज अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे
Ganesh Visarjan
Ganesh VisarjanEsakal
Updated on

आज अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईत होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्रांची मदत देखील होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी देखील मुंबई पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त असणार आहे.

१६ हजारांहून अधिक पोलिस तैनात

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून १६ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय मुंबईत होमगार्डस्‌, विविध स्वयंसेवी संस्था, पोलिस मित्रांची मदत घेण्यात येणार आहे.

Ganesh Visarjan
Accident News: चालकाचे नियत्रंण सुटलं अन् भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

पोलिस यंत्रणा

८ अप्पर पोलिस आयुक्त

२५ पोलिस उपायुक्त

४५ सहायक पोलिस आयुक्त

२८६६ पोलिस अधिकारी

१६२५८ पोलिस कॉन्स्टेबल

३५ राज्य राखीव दलाच्या तुकड्या

Ganesh Visarjan
Ganpati Visarjan Miravnuk : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

विसर्जनस्थळी सीसी टीव्ही

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, मार्वे, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह प्रत्येक विसर्जनाची ठिकाणे सीसी टीव्ही निगराणीखाली असून प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच वाहतूक पोलिस विभागाकडून वाहतुकीचे योग्य नियमन करण्याकरीता चोख उपाययोजना करण्यात आली आहे.

Ganesh Visarjan
Pune Ganpati Visarjan 2023 : मिरवणुकांवर ‘सीसीटीव्ही’तून नजर; विसर्जन सोहळ्यासाठी पोलिस दल सज्ज

गिरणगावात विशेष बंदोबस्त

मुंबईतील परळ-लालबाग भागात विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांची येणारी संख्या लक्षात घेता या भागात विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. केवळ लालबाग-परळ भागात ३०० सीसी टीव्हींची सोय केली आहे. ३ दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिसांची ५ पथके, ३ सीसी टीव्ही व्हॅन, २५०० पोलिस मित्र कार्यकर्ते, ६ वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Ganesh Visarjan
रात्री १२ पर्यंतच परवानगी! सोलापूर जिल्ह्यातील ३००४ मंडळांची आज विसर्जन मिरवणूक; वाहनांसाठी 'असा' आहे पर्यायी मार्ग; बंदोबस्तासाठी सव्वासहा हजार पोलिस

दहशतवादी विरोधी पथकाची एक टीमदेखील तैनात असणार आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी ३ बॉम्बनाशक पथकेदेखील तैनात असणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी ६ छेडछाडविरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत. मोबाईल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी ६ विशेष पथके असणार आहेत.

मुंबईतील गिरगांव, दादर, जुहू, मार्वे, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह 73 नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त 160 हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.