Mumbai Police: साताऱ्यात दहशतवादी वावरत असल्याचा मुंबई पोलिसांना आला फोन; अन्..

उपशीर्षक: मुंबई पोलिसांच्या कारवाईने दहशतवादी धमकीच्या कॉलचा पर्दाफाश; आरोपी ताब्यात
Mumbai Police: साताऱ्यात दहशतवादी  वावरत असल्याचा मुंबई पोलिसांना आला फोन; अन्..
Updated on

साताऱ्यात दहशतवादी वावरत असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणानंतर सर्वच तपास यंत्रणा कामाला लागली. दूरध्वनी करणाऱ्याच शोध घेत मुंबईतील टिळक नगर परिसरातून शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपीची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे त्याने गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.यापूर्वी गुरुवारी कुलाबा येथील हॉटेल ताजमध्ये 10 ते 11 पाकिस्तानी दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती.(unknown call to mumbai police)

Mumbai Police: साताऱ्यात दहशतवादी  वावरत असल्याचा मुंबई पोलिसांना आला फोन; अन्..
Mumbai Police: मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या!

प्रकरण काय?

साताऱ्यात काही दहशतवादी आले असून खूप मोठी कारवाई करण्याची त्यांची तयारी असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झाला. दहशतवादद्यांच्या माहितीमुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तातडीने गुन्हे शाखा व इतर तपास यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली.

त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करत दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळविण्यात आली. दूरध्वनी करणाऱ्याला ताब्यात घेऊन टिळक नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी संशयीताची चौकशी केली असून त्याच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला होता. सात वर्षांपूर्वी संशयीत व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तेव्हापासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे संशयीत व्यक्तीच्या जावयाने पोलिसांना सांगितले. संशयीत व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे वास्तव्याला आहे.(tilaknagar police station)

लागोपाठ अफवांचे कॉल

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला हॉटेल ताजमध्ये 10 ते 11 दहशतवादी शिरल्याचा गुरूवारी दूरध्वनी आला होता. याबाबत कुलाबा पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने हॉटेलमध्ये जाऊन तेथील सुरक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर हॉटेलची पूर्णपणे कसून तपासणी करण्यात आली. पण मिळालेल्या माहितीनुसार काहीच आढळले नाही. याप्रकरणानंतर गुन्हे शाखा व इतर यंत्रणांना माहिती देण्यात आली असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.(mumbai police on duty)

Mumbai Police: साताऱ्यात दहशतवादी  वावरत असल्याचा मुंबई पोलिसांना आला फोन; अन्..
Mumbai Police: नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अ‍ॅक्शन मोडवर...सुरक्षेसाठी 11500 पोलीस तैनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.