Mumbai Police
Mumbai Police

Mumbai Police: मुंबई पोलिसांची जिगरबाज कामगिरी; समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवलं अन्...

खुद्द मुंबई पोलीस आयुक्तांनी या कामगिरीचं सोशल मीडियावर पोस्ट लिहून कौतुक केलं आहे.
Published on

मुंबई पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांनी जिगरबाज कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. कार्टर रोड इथल्या समुद्रात बुडणाऱ्या एका व्यक्तीला तिथं गस्तीवर असलेल्या चार पोलीस कर्चमाऱ्यांनी वाचवलं. या व्यक्तीला पाण्याबाहेर काढून त्याला प्रथमोपचार दिले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या या कामगिरीला दाद देताना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी कौतुक केलं आहे. याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला.

Loading content, please wait...