Mumbai Crime : मुंबईत १३९ फ्लॅट खरेदीदारांची कोट्यवधींची फसवणूक; डेव्हलपर विरोधात गुन्हा दाखल

Crime
Crime esakal
Updated on

Mumbai Crime : १३९ फ्लॅट खरेदीदारांची ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विकसाक, त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि दोन साथीदारांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Nashik Bribe Crime : येवल्यात 9 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एकास अटक

इम्तियाज हसन अली मरेडिया, प्यार अली मरेडिया, बरकत अली मोमीन, नुरुद्दीन मखनोजिया, सानिफ मरेडिया आणि आकील मरेडिया अशी आरोपींची नावे आहेत.

Crime
Jalgaon Crime : भुसावळला 7 घरफोड्या उघड; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या प्रकरणातील तक्रारदार मोईनुद्दीन बोरा हे अंधेरीचे रहिवासी आहेत. आरोपी बांधत असलेल्या जोगेश्वरीतील एस. व्ही. रोडवरील बहुमजली ‘मॅरेडियन हाईट्स’मध्ये घर घेण्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी विकसकाला पैसे दिले होते.

Crime
Crime News: विवाहितेवर अत्याचार, सासऱ्याला सांगितले म्हणून कुऱ्हाड घेऊन आला घरी, अन्...
Crime
Nashik Crime: तारण सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्था चेअरमनसह खातेदाराविरुद्ध गुन्हा

आरोपींनी जोगेश्वरी पश्चिमेकडील आलिशान टॉवर ‘मॅरेडियन हाईट्स’ बांधण्याच्या बहाण्याने गृह खरेदीदारांकडून पैसे घेतले होते. तथापि इमारतीचा प्रकल्प पूर्ण करण्यात विकसक अयशस्वी झाला. त्याऐवजी आरोपीने घर खरेदीदारांचे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरत्र वापरले.

घर खरेदीदाराच्या तक्रारीच्या आधारे, आर्थिक गुन्हे शाखेने प्रथम गुरुवारी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आणि नंतर तपास हाती घेतला. आरोपीने १३९ फ्लॅट खरेदीदारांकडून ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. येत्या काळात आरोपींचा या प्रकरणी जबाब नोंदवून पुढील कारवाई आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.