मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सर्व पक्षांकडून निवडुकीच्या तयारीला जोरात सुरवात देखील झालीये. अशात निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांमधून इनकमिंग आणि आउट गोइंग देखील सुरु होतं. याचीच प्रचिती आता येताना पाहायला मिळतेय. भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव समीर देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर हातावर शिवबंधन बांधुन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
कोण आहेत समीर देसाई ?
मुंबई महापालिकेच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. निवडणुकांच्या आधीच भाजपमधून आता शिवसेनेत इनकमिंग सुरु झालंय. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर समीर देसाई यांचा भारतीय जनता पक्षात होणारा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा मनाला जातोय. समीर देसाई यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळकटी मिळेल असंही राजकीय विश्लेषक म्हणतायत.
भाजप सोडण्याचं कारण काय ?
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात अस्वस्थता असल्याचं जाणकार सांगतात. अशात भारतीय जनता पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून समीर देसाई यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकलाय असं बोललं जातंय.
mumbai political news ex bjp secretory sameer desai joins Shivsena in the presence of uddhav thackeray
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.