'सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही'; बाळा नांदगावकर यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला

'सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही'; बाळा नांदगावकर यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला
Updated on

मुंबई - डोंबिवलीतील माजी मनसे अध्यक्ष राजेश कदम तसचे मंदार हबळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम राम ठोकला आहे. कदम शिवसेनेत तर हबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मनसेला धक्का दिला आहे. त्याच संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही असं म्हणत त्यांनी आऊटगोईंग करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

कल्याण-़डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. मनसेच्या मातब्बर नेत्यांना इतर पक्षांनी आपल्या जाळ्यात ओढले आहे. मनसेला बसलेल्या या फटक्यामुळे बाळा नांदगावकर यांनी त्याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. 'काहींनी पक्ष सोडल्याने पक्षाला काही फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही', असं म्हणत मनसेतून आऊटगोईंग केलेल्यांना नांंदगावकर यांनी टोला लगावला आहे.

'राजकारणात नेते येत जात असतात, त्यात नवीन काय आहे. हे काही पहिल्यांदा घडतंय का? राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. राष्ट्रवादीतून किती लोक सोडून गेले. कॉंग्रेसचे किती लोकं सोडून गेले. भाजपमधूनही गेले. पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर भाष्य करण्यात काही पॉइंट नाही,  असंही नांदगावकर यावेळी म्हणाले.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai political update Bala Nandgaonkars criticism on the leaders who left MNS in kalyan dombivali

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()