"मलिक आजोबांच्या छान छान गोष्टी परिकथांच्या पुस्तकांमध्ये अजरामर होतील"

मुंबई भाजप महिला मोर्चाने उडवली खिल्ली
sheetal gambhir desai
sheetal gambhir desaisakal media
Updated on

मुंबई : आपल्याकडे लहान मुलांना झोपविताना किंवा नावडते जेवण भरविताना सांगायच्या आजीच्या छान छान गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर नबाब मलिक (Nawab Malik) आजोबांनी सांगितलेल्या छान छान गोष्टी लवकरच लहान मुलांच्या परिकथांमध्ये (children fairy tale) अजरामर होतील, अशा शब्दांत भाजप (bjp) महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (sheetal gambhir desai) यांनी खिल्ली उडवली आहे.

sheetal gambhir desai
मुंबई पोलिसांना पाहून पळताना आरोपी तिसऱ्या मजल्यावरुन पडला

नबाब मलिक यांनी एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर तसेच भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उडवली आहे. या सर्वांचे गुंडांशी तसेच ड्रग माफियांशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मधे ओढले आहे. त्यावरून श्रीमती देसाई यांनी त्यांच्यावर वरीलप्रमाणे टीका केली आहे. अजाण बालकांच्या जगात काल्पनिक, सुरस कथा आवडीने वाचल्या जातात. त्यात राक्षस येतात, प्राणी बोलतात, परी मुलांना वर देते, वाघ व माकड मित्र असतात, रडणाऱ्या लाकूडतोड्याला वनदेवी विहिरीतून सोन्याची कुऱ्हाड काढून देते, जंगली प्राणी माणसांच्या मुलांना वाढवतात, अशा काल्पनिक गोष्टी असतात.

अर्थात लहानपणी मिटक्या मारत वाचलेल्या या कथा मोठेपणी आपल्याला हास्यास्पद वाटतात व त्यातील फोलपणा आठवून आपण त्या गंभीरपणे घेत नाही. मलिक आजोबांच्या कथा आता जरी महाभकास आघाडीच्या समर्थकांना रहस्यकथांप्रमाणे वाटत असल्या, तरी विचारी नागरिकांना त्यातील फोलपणा ठाऊक झाला आहे. अर्थात असे असले तरी त्यांनी सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक कथा बालसाहित्यामधे अजरामर होतील, अशी उपहासात्मक टीका श्रीमती देसाई यांनी केली आहे.

काल्पनिक कथा रचण्याचा मलिक यांचा एवढा सुंदर गुण यापूर्वी कोणालाच ठाऊक नव्हता. यामुळे आता बॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूडमधील रहस्यमय, सनसनाटी कथालेखकांना देखील स्वतःच्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. व्रात्य मुलेदेखील हल्ली आजीच्या गोष्टी न ऐकता मलिक आजोबांच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह धरू लागली आहेत. इतकेच नव्हे तर, बेटे सो जा, नही तो गब्बर आजाएगा, हा शोले मधील डायलॉग सर्वतोमुखी झाला होता. त्याचप्रमाणे, बेटे चुप हो जा, नही तो नबाब आजाएगा, हा डायलॉग कर्तव्यदक्ष सरकारी अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी आता भ्रष्ट वरिष्ठांकडून वापरला जात असल्याचा टोला श्रीमती देसाई यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.