Mumbai Politics : भाजपचा मुंबईत रामलीला कार्यक्रमांचा धडाका!

Mumbai Politics : भाजपचा मुंबईत रामलीला कार्यक्रमांचा धडाका!
Updated on

Mumbai Politics : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप मुंबईत रामलीला कार्यक्रमांचा धडाका लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मैदानासाठीच्या शुल्कात ५० टक्के सवलत व अग्निशमन शुल्क पूर्णपणे माफ करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रामलीला उत्सवात भाजप मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवात मुंबईत विविध ठिकाणी रामलीला कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; मात्र यंदा पहिल्यांदाच या कार्यक्रमाविषयी पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांची पालिका प्रशासनाबरोबर बैठक होते आणि मंडळांच्या अडचणी, प्रश्न सोडवले जातात.

त्याच पार्श्‍वभूमीवर रामलीला मंडळांच्या समस्या पालिका सोडवणार आहे. मुंबईतील आझाद मैदानासह विविध ठिकाणी दरवर्षी रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. रामलीला कार्यक्रमाच्या मैदानासाठी ५० टक्के सवलत व अग्निशमन शुल्क माफ करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला पालकमंत्री लोढा यांनी दिले होते. यासंदर्भात पालिका मुख्यालयात नुकतीच मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाचे आयोजक, पोलिस व पालिका अधिकारी उपस्थित होते.

Mumbai Politics : भाजपचा मुंबईत रामलीला कार्यक्रमांचा धडाका!
Mumbai News : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

या बैठकीत रामलीला कार्यक्रम आयोजकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर लोढा म्हणाले, की ‘रामलीलाचे आयोजक आपली संस्कृती आणि वारसा पुढे नेत आहेत, त्यामुळे त्यांना योग्य ते सहकार्य करणे गरजेचे आहे. विशेषत: आझाद मैदानावर रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे कार्यक्रमाच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.’ ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने मैदानाचे शुल्क ५० टक्केने कमी केले आहे. तसेच अग्निशमन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यासह इतर मागण्यांची पूर्तताही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

एक खिडकी योजना

रामलीला कार्यक्रमासाठी पालिकेकडून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे आयोजकांना सर्व परवानग्या एका छताखाली मिळणार आहेत. सोबतच कार्यक्रमाच्या परिसरातील स्वच्छतेच्या दृष्टीने मोबाईल टॉयलेट तसेच औषधफवारणी केली जाणार आहे.

Mumbai Politics : भाजपचा मुंबईत रामलीला कार्यक्रमांचा धडाका!
Firing Maha Bodhi Vihar: गयाच्या महाबोधी विहार परिसरात गोळीबार; एका पोलिसाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.