Mumbai Politics: ईशान्य मुंबई लोकसभेसाठी शरद पवार गट उत्सुक ; पदाधिकाऱ्यांनी घेतली पवारांची भेट

Mumbai Politics: ईशान्य मुंबई लोकसभेसाठी शरद पवार गट उत्सुक ; पदाधिकाऱ्यांनी घेतली पवारांची भेट
Updated on

Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड अमोल मातेले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार , हरीश सनस , बबन काणावजे , आमदार मिलिंद कांबळे , अजितराव राणे , विजू शिरोडकर , रुपेश खांडगे , आरिफ सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Mumbai Politics: ईशान्य मुंबई लोकसभेसाठी शरद पवार गट उत्सुक ; पदाधिकाऱ्यांनी घेतली पवारांची भेट
Sharad Pawar Solapur Visit: शरद पवार अन्‌ नरेंद्र मोदी एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर; घडामोडींना वेग

आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा अशी मागणी यावेळी मुंबई युवक अध्यक्ष ऍड अमोल मातेले यांनी शरद पवार यांच्याकडे केली. अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात नव्या कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदी निवड झाल्या नंतर ऍड अमोल मातेले यांनी शरद पवार यांची बारामती येथील गोविंद बाग येथे भेट घेतली आणि यावेळी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा अशी यावेळी मागणी करण्यात आली या विषयावर आपण सकारात्मक असून 24 - 25 जानेवारी दरम्यान अंतिम भूमिका जाहीर केली जाईल असे मातेले म्हणाले.

Mumbai Politics: ईशान्य मुंबई लोकसभेसाठी शरद पवार गट उत्सुक ; पदाधिकाऱ्यांनी घेतली पवारांची भेट
Satyashodhak Movie Sharad Pawar: सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी सपत्नीक पोहचले शरद पवार, सरकारकडे केली 'ही' मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.