Mumbai Pollution: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; हवेतील प्रदूषण झाले कमी!

Pollution: भांडुप ११३, कुलाबा १३४, माझगाव १७४, वरळी १३६, बोरिवली १७०, अंधेरी १३३ एक्यूआय
Mumbai Pollution
Mumbai Pollutionsakal
Updated on

Mumbai Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता किंचित सुधारली असून हवा गुणवत्ता निर्देशांक १७४ सह मध्यम नोंदवण्यात आला आहे. असे असले तरी मालाड, बीकेसी आणि मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत हवेची स्थिती वाईट आहे.

Mumbai Pollution
Mumbai Pollution : प्रदूषणात उल्हासनगरने मुंबईला टाकले मागे

सफर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार बीकेसी, मालाडमधील हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही. तेथील प्रदूषण अद्याप कायम आहे. बीकेसी २५७ , मालाड २७४ एक्यूआयची नोंद झाली आहे. येथील हवेची स्थिती खराब असून, तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट नोंदवला आहे.

मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतही प्रदूषण वाढलेले आहे. तेथे २२७ एक्यूआयची नोंद झाली आहे. मुंबईतील बीकेसी आणि मालाड परिसर वगळता इतर परिसरातील हवेची गुणवत्ता काहीशी सुधारली आहे.

Mumbai Pollution
Mumbai Pollution: मुंबई प्रदूषण मुक्त करण्यासाठी मनपा सज्ज; घेतला अजून एक महत्वाचा निर्णय!

बरेच दिवस रेड झोनमध्ये असणाऱ्या चेंबूरमधील हवा गुणवत्ताही सुधारली आहे. तेथील एक्यूआय १६८ पर्यंत खाली आला आहे. तर भांडुप ११३, कुलाबा १३४, माझगाव १७४, वरळी १३६, बोरिवली १७०, अंधेरी १३३ एक्यूआयसह येथील हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम नोंदवण्यात आला आहे.

Mumbai Pollution
Mumbai Crime News: मुंबईत महिला डॉक्टरवर अत्याचार, ३८ वर्षीय व्यक्तीला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.